जळगाव (प्रतिनिधी) मुंबई येथे सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधवेशना दरम्यान पुरवणी बजेट अंतर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघात पाच रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी 15 कोटी तसेच चांदसर येथील शासकीय आश्रम शाळा – शालेय इमारतीच्या बांधकामासाठी 14 कोटी 50 लक्ष इतका निधी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने एकूण 29.50 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येणारे प्रमुख जिल्हा मार्ग रस्ते व त्यावरील पुलांच्या विकासाकरिता 15 कोटी निधीचा समावेश आहे. दळणवळणाची साधने चांगली उपलब्ध असतील तर रोजगार व उद्योग वाढीला चालना मिळते. ही बाब लक्षात घेऊन मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणले गेले आहे. रस्ते विकासासाठी व शालेय इमारत बांधकामासाठी विकासास मदत होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
रस्ते व पुलांसाठी 15 कोटी तर चांदसर शासकीय आश्रम शाळेसाठी 14.50 कोटी निधी मंजूर !
जळगाव तालुक्यातील असोदा ते राष्ट्रीय महामार्ग क्र. 06 – मकरा पार्क ते तरसोद – भादली बु. रस्ता. प्रजिमा – 152 किमी 7/00 ते 10/000 (भाग मकरा पार्क ते तरसोद) चे जलनिस्सारणासह सुधारणा करणे 3 कोटी, देव्हारी – धानवड – चिंचोली रस्ता प्रजिमा-109 किमी 3/00 व 5/00 वर लहान पुलाचे बांधकाम करणे – 3 कोटी, रिधूर – नांद्रा – चांदसर रस्ता प्रजिमा – 85 कि.मी 1/630 वर लहान पुलाचे बांधकाम करणे – 3 कोटी तर धरणगाव तालुक्यातील, कवठळ – शेरी रस्ता प्रजीमा – 85 किमी, 13/400 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे – 3 कोटी, नांदेड – साळवा रस्ता प्रजीमा – 02 साळवा गावामध्ये कॉंक्रीट रस्ता बांधकाम करणे 3 कोटी अश्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख जिल्हा मार्ग पूल व रस्त्यांसाठी 15 कोटी निधीच्या रस्त्यांना मान्यता मिळाली असून चांदसर येथील शासकीय आश्रम शाळा – शालेय इमारतीच्या बांधकामासाठी 14 कोटी 50 लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
रस्ते व पूल मजबुत असतील तर वाहने गतीमान होऊन वेळेची बचत होते. चांगले पूल व रस्ते हे फक्त दळण – वळणासाठी नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य सुकर करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. पुलाच्या कामांमुळे गावं जोडली जावून रस्ते विकासामुळे गावा – गावा पर्यंत आरोग्य, शिक्षण व रोजगार पोहचतो. दर्जेदार रस्ते व पूल करण्यासाठी यापूर्वीही जाणीवपूर्वक प्रयत्न केल आहे. रस्ते व पुलांसाठी सुमारे 15 कोटी तर चांदसर शासकीय आश्रम शाळेसाठी 14.50 कोटी निधी मंजुरी मिळाली आहे.
- ना. गुलाबराव पाटील