TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा बनावा यासाठी सर्व महिलांनी एकत्र यावे : रोहिणीताई खडसे !

vijay waghmare by vijay waghmare
July 31, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या असुन राज्य सरकार महिलांची सुरक्षितता करण्यास कमी पडत आहे. उरण, शिळ फाटा येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे गृह खात्याची अब्रु वेशीवर टांगली गेली आहे. याच्या निषेधार्थ आणि उरण, शिळ फाटा अत्याचाराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी

राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या नेतृत्वात जळगाव येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, महानगराध्यक्ष मंगलाताई पाटिल उपस्थित होत्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे म्हणाल्या एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा डंका वाजविला जात असताना दुसरीकडे राज्यात लाडक्या बहिणींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या महिन्यात उरण आणि शिळफाटा येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना मन विषण्ण करणाऱ्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. प्रगतशील महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत, या सर्वांची मान शरमेने खाली झुकवणाऱ्या आणि अशा नराधमांवर कायद्याचा आणि गृह खात्याचा धाक राहिला नसल्याचे दर्शविणाऱ्या आहेत. नवी मुंबईतील उरण येथील एका बाविस वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमाने निर्दयीपणे पिडितेच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन तिचे हाल हाल करून तिला मारले आणि त्यानंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न करून तिच्या शरीराची अक्षरशः विटंबना केल्याचे निदर्शनास आले आहे.

तर दुसऱ्या घटनेत बेलापूर येथिल तीस वर्षीय महिला घरगुती भांडण झाल्याने मानसिक शांतता मिळावी म्हणून डायघरजवळील शीळ फाटा येथिल गणेश घोळ मंदिरात गेली. या दोन्ही घटना अत्यंत अमानवीय आणि निर्दयी आहे. या घटनांमुळे राज्याचे गृह खाते निद्रिस्त असल्याचे आणि महिलांची सुरक्षा करण्यास कमी पडत असल्याचे जाणवत असून या घटनांमुळे राज्याच्या गृह खात्याची अब्रु चव्हाट्यावर आली आहे.

या दोन्ही घटना क्रुरतेचा कळस गाठणाऱ्या असुन निषेधार्ह आहेत. या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि निद्रिस्त असलेल्या गृह खात्याला खडबडून जागे करण्यासाठी हे आंदोलन आहे. महिला अत्याचाराच्या या घटनाची केस जलद गती न्यायालयात चालवाव्या त्यासाठी सरकारने अनुभवी वकील नेमावा व पिडीत कुटुंबाला सरंक्षण तसेच आर्थिक सहाय्य द्यावे व विकृत मानसिकतेच्या पाषाण हृदयी आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचे रोहिणीताईखडसे यांनी सांगितले.

माणूस रानटी अवस्थेतून संगणक युगात आला माणसाने आज वैचारिक सुसंस्कृतपणाचा टप्पा गाठल्याच्या गप्पा मारल्या जातात. परंतु माणसाचा मूळ रानटी स्वभाव कायम असून स्वभावातील रानटी पणा विकृत होत असल्याचे या घटना मधून जाणवते. या विकृत आणि मुजोर मानसिकतेला भयभीत करून अशा कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी काठोरातील कठोर शिक्षा देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली पाहिजे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्त्रिया माता भगिनी आहेत आणि माता भगिनींचा सन्मान करण्याबद्दल मुलांना शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे स्त्रियांवरील अत्याचार समाजात ज्या पद्धतीनेन पहिले जातात, त्यावर सामाजिक भूमिका बदलायला हवी. अत्याचाराच्या विरोधात स्त्रियांची भूमिका कणखर होणे आवश्यक आहेच; पण शिवाय याविरुद्ध काय पाऊल उचलता येईल, कायदा काय म्हणतो आणि मदत कुठे मागता येईल, याविषयी समाजजागृती करणे आवश्यक आहे. अत्याचाराने त्रस्त झालेल्या महिलांचे मानसिक खच्चीकरण झालेले असते. अशावेळी तिला मानसिक आणि भावनिक आधार देणे आवश्यक आहे. शिवाय तिचे योग्यप्रकारे सामाजिक पुनर्वसन करणेही गरजेचे आहे, असेही रोहिणीताई खडसे यांनी सांगितले. महिलांवरील या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी व अशा घटना परत घडू नये, यासाठी कठोर कायदा करण्यासाठी शासनाला भाग पाडण्यासाठी समाजातील सर्व महिलांनी आणि सर्व पक्षातील महिला नेत्यांनी एकत्रित येण्याचे रोहिणी खडसे यांनी आवाहन केले.

यावेळी वर्षा राजपुत, लिलाताई रायगडे, ममता सोनवणे, माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी,युवक महानगराध्यक्ष रिकु उमाकांत चौधरी,सुनिल माळी, चेतन पवार संग्राम सूर्यवंशी, हितेश जावळे यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonRohini khadse

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरणमध्ये ऊर्जा जागृती

September 19, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

रस्त्याच्या कामासाठी प्रहारने भरपावसात खड्ड्यात मांडला ठिय्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संजय राऊतांवर निलेश राणेंचा एकेरी भाषेत हल्लाबोल, म्हणाले…

August 2, 2021

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कर्करोग तपासणी व मोतीबिंदू उपचार शिबीराचे आयोजन !

September 12, 2022
The Governor of Nagaland, Shri R.N. Ravi calling on the Prime Minister, Shri Narendra Modi, in New Delhi on August 08, 2019.

मन की बात; अजिंठा लेण्यांचा वारसा डिजिटल होणार : मोदी

November 29, 2020

Completion Of Jeneponto Wind Farm Accelerated To July

July 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group