जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनातर्फे सोमवारी (१ फेब्रवारी) आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दुरचित्रवाणी परिषदेव्दारे व्दारे संपन्न झाला. जिल्हास्तरीय लोकशाही दिनी २९ अर्ज प्राप्त झाले आहे.
या लोकशाही दिनात जिल्हाभरातून एकूण २९ तक्रार अर्ज प्राप्त झाले असून त्यात तहलिदार जळगाव १५ अर्ज, तहसिलदार जामनेर ४, तहसिलदार एरंडोल २, तहसिलदार अमळनेर १, तहसिलदार चोपडा २, तहसिलदार पाचोरा ४, तर तहसिलदार चाळीसगाव यांचेकडे एक अर्ज प्राप्त झाला आहे. प्राप्त झालेले सर्व अर्ज संबंधित विभागांकडे पाठविण्यात आले असून ते अर्ज निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व संबंधित विभागांना दिल्या.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनास जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचेसह जिल्हास्तरीय अधिकारी तर तालुकास्तरावर संबंधित तालुक्याचे तहसीलदारांसह तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी तक्रारदारांनी तहसील कार्यालयात उपस्थित राहून आपल्या तक्रारी दुरचित्रवाणी परिषदेव्दारे (video Conferncing) व्दारे मांडल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आतापर्यंतच्या लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जांपैकी प्रलंबित तक्रार अर्जांचाही आढावा घेतला. प्रलंबित तक्रार अर्जांवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. तक्रारदारांना पुन्हा लोकशाही दिनात तक्रार घेऊन येण्याची आवश्यकता भासू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.