TheClearNews.Com
Sunday, July 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

सीबीएसई पॅटर्नच्या ‘अनुभूती विद्यानिकेतन’ चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

vijay waghmare by vijay waghmare
June 8, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘मुलांचा स्क्रिन टाईम, आर्टिफिशीयल तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाच्या स्पर्धात्मक युगात चांगली पिढी, समाज घडवितांना पाहिजे तितके प्रयत्न होताना दिसत नाही. मात्र अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती बालनिकेतन आणि आता अनुभूती विद्यानिकेतन जी सीबीएसई (CBSE) पॅटर्नमध्ये सुरू झाली. जी विद्यार्थ्यांना फक्त पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता बौद्धिक, सृजनशील, जीवन कौशल्य आणि शारीरिक आरोग्य या सर्व पैलूंचा सर्वांगीण विकास घडविण्यास कठिबद्ध राहिल यातून भारताची दिशादर्शक पिढी घडेल; असे जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी सांगितले.

‘अनुभूती विद्यानिकेतन’ च्या उद्घाटनाप्रसंगी पालकांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, मनोज परमार, शोभना जैन, अंबिका जैन, अर्थम जैन व मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सुरूवातीला सरस्वती चे विधिवत पूजन झाले. त्यानंतर संस्थापक भवरलाल जैन यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. ब्रह्मवृदांनी शांती मंत्र तर स्कूलच्या शिक्षिकांनी प्रार्थना म्हटली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना गणवेश व पूस्तके वाटप करण्यात आलीत.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 12 जुलै ते 16 जुलै 2026 !

समाजकार्याचा आदर्श – अनाथ मुलीसाठी जयहर्ष फाऊंडेशनची 5 हजार रुपयांची मदत…!

अनिल जैन पुढे बोलताना म्हणाले की, श्रद्धेय भवरलाल जैन तथा मोठ्याभाऊंनी जगात जे जे चांगले आहे त्याचे आपल्या गावाला, समाजाला फायदा होऊन पुढची पिढी घडावी या उद्देशाने ‘अनुभूती निवासी स्कूलची’ स्थापना केली. त्याच विचारातून संस्कारशील समाज निर्मितीची प्रेरणा देणारी ‘अनुभूती बालनिकेतन’ ही मॉन्टेसरी पद्धतीने सुरू केली. ह्यात आता ‘अनुभूती विद्या निकेतन’ जी सीबीएसई पॅटर्नमध्ये सुरू झाली. जे मोठ्याभाऊंचे स्वप्न होते.

गुरुकूल पद्धतीच्या धर्तीवर असलेल्या या स्कूलमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) यासह आर्ट अभ्यासण्यासाठी विशेष क्लास रूमची व्यवस्था याठिकाणी आहे. ज्यातून विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता, समस्या सोडवणे आणि विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित होण्यास मदत होऊ शकते. शिक्षण तर आहेच त्यासोबत आपण जेथून आलात त्यापेक्षा हे जग सुंदर करण्याचा संस्कार ह्या मुलांमध्ये रूजवला गेला पाहिजे, त्यासाठीच शिक्षकांसह पालकांना लक्ष्य द्यावे लागले; यातून आदर्श समाज घडून जगात भारताची उंची आणखी वाढेल. सीबीएसई पॅटर्नची पहिली बॅच असून मुलं मुलांकडून खूप काही शिकतात त्यामुळे ह्या बॅचला ‘लिडर बॅच’ म्हणून संबोधले जाईल. अनुभूती विद्यानिकेतनची पहिली नंतर पुढे बारवी पर्यंत बॅच सुरू राहिल. मेहरूण परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी भविष्यात पहिली ते बारवी पर्यंत अनुभूती विद्यानिकेतन स्कूल उभारणार असल्याचा मानस अनिल जैन यांनी बोलून दाखविला.

मनोज परमार यांनी प्रास्ताविक केले, त्यात त्यांनी स्कूल विषयी जैन परिवाराचे विचार मांडले. भवरलाल जैन यांच्या ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ या पूस्तकातील शिक्षणाविषयीचे प्रेरणादायी विचार सांगितले. पालकांनी आपल्या पाल्यांसोबत फक्त शाळेत अॅडमिशन घेण्यापुरते थांबू नये. नवनवीन कल्पनांसह भविष्यातील पिढी घडविण्यासाठी वर्तमान समजून घेणे महत्त्वाचे आहे. व्यापक शिक्षण आणि बालकांच्या सर्वांगिण विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण ठरणारे शिक्षण ‘अनुभूती विद्यानिकेतन’ मध्ये दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी व पालकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

अनुभूती विद्या निकेतन ची वैशिष्ट्ये
उज्ज्वल भविष्यासाठी सीबीएसई पॅटर्न अभ्यासक्रम, अध्ययन, सहशालेय उपक्रम व जीवन कौशल्यांचा समतोल साधणारी व्यापक शिक्षणपद्धती; बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि शारीरिक विकासावर भर देऊन सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी विश्वसनीय वाहतूक ने-आण सुविधा, समर्पित शिक्षण प्रणालीसह अनुभवी शिक्षकवृंद. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नैसर्गरम्य वातावरण अशी वैशिष्ट्ये अनूभूती विद्या निकेतन ची अधोरेखित करणारी आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAnubhuti Vidyaniketan’ will create a generation of leaders - Anil Jain

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 12 जुलै ते 16 जुलै 2026 !

July 12, 2026
धरणगाव

समाजकार्याचा आदर्श – अनाथ मुलीसाठी जयहर्ष फाऊंडेशनची 5 हजार रुपयांची मदत…!

July 11, 2026
गुन्हे

पिंपळगावात घरफोडी; ६ हजारांची रोकड लंपास संशयित पोलिसांच्या ताब्यात

July 11, 2026
गुन्हे

जळगावात ५६ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; दोघांना ठोकल्या बेड्या !

July 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 जुलै 2026 !

July 11, 2026
जळगाव

टहाकळी येथील बालिकेच्या मृत्यूप्रकरणी खडसेंचा जाब; प्रशासनाकडून चौकशी सुरू

July 10, 2026
Next Post

Today's horoscope : आजचे राशीभविष्य 9 जून 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : राशिभविष्य, गुरुवार ९ जून २०२२ ; जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस

June 9, 2022

विरोधकांचा गदारोळ, लोकसभेनंतर राज्यसभेचंही कामकाज तहकूब !

November 29, 2021

गिरणा पुनरुज्जीवन अभियान राज्याला दिशादर्शक सामाजिक चळवळ ; गिरिश महाजन यांचे प्रतिपादन

May 2, 2022

अमळनेर येथे गटशिक्षणाधिकारी आर.डी. महाजन यांना प्रोटानतर्फे निवेदन

February 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group