जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील मुमराबाद येथील खंडेराव महाराज मंदीरसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तीर्थक्षेत्र विकास निधीतून 3 कोटी निधी उपलब्ध करून दिळा आहे. याच कामाची पाहणी त्यांनी नुकतीच केली.
मंदिर परिसरात कामाला सुरुवात झाली असून मंदिर परिसरात प्लेव्हर ब्लाँग बसविण्याचे काम प्रगती पथावर आहे. याच कामांची पाहणी नुकतीच पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांनी केली. यावेळी त्याच्यासोबत महेश चौधरी, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महेंद्र सोनवणे, उपाध्यक्ष भरत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विलास सोनवणे, किरण पाटील,जीतेंद्र पाटील, धरणगाव पंचायत समितीचे मा. सभापती सचिन पवार हे उपस्थित होते.