मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला सुरुंग लावल्याने राज्याच्या राजकारणात माेठी उलथापालथ सुरू असल्याचं दिसत आहे. गुजरात राज्यातील सुरत-अहमदाबाद येथे शिंदे हे सुमारे ३५ आमदार गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात शिवसेनेचे आणखी ३ आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. तीन आमदार नेमके कोण आहेत हे अद्याप कळू शकलेलं नाही.
राज्याच्या राजकारणाला सुरुंग लावण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सुमारे ३५ आमदार तर रायगडमधील तीन आमदार सहभागी झाले या तीन्ही आमदारांचे फाेनही नाॅट रिचेबल हाेते, शिंदे यांच्या सुरुंग पॅटर्नमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार चांगलेच कचाट्यात सापडले आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात या ३ आमदारांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे आणखी ३ आमदार एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ गुवाहीटमध्ये दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर झदी स्पष्ट केली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्यासोबत सध्या शिवसेनेचे ४० आमदार असून आणखी १० आमदार येणार आहे . आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार, आम्ही अद्याप शिवसेना सोडण्याचा किंवा दुसऱ्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. फक्त आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांची विचारधारा आम्ही पुढे घेऊन जात आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड सत्तेसाठी आम्ही करणार नाही,” असे स्पष्ट मत एकनाथ शिंदे दिले आहे.