जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज सांयकाळी प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यातून ६५३ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून ३३१ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
आजची आकडेवारी
जळगाव शहर -६८, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-२४, अमळनेर-५, चोपडा-१२, पाचोरा-१३, भडगाव-६, धरणगाव-२, यावल-०, एरंडोल-१, जामनेर-१०१, रावेर-८, पारोळा-३, चाळीसगाव-७३, मुक्ताईनगर-९, बोदवड-२ आणि अन्य जिल्हा १ असे एकुण ३३१ रूग्ण आज आढळून आले आहे.
जिल्ह्यात एकुण ४९ हजार ४३५ रूग्ण आढळून आले असून ४३ हजार ८०१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज ६रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण जिल्ह्यात १२०४ रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. तर जिल्ह्यात आता ४ हजार ४३० रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.