धरणगाव (प्रतिनिधी) येथील जागृती युवक मंडळ (वर्ष ३७ वे) या ठिकाणी आज घटस्थापनेच्या निमित्ताने विधिवत पूजन कॉन्ट्रॅक्टर भगवानभाऊ महाजन यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
आज नवरात्रोत्सवाची उत्साहात सुरुवात झाली. मरीमाता मंदिर परिसरात सालाबादप्रमाणे यावर्षी देखील जागृती युवक मंडळाच्या माध्यमातून देवीच्या मूर्तीची विधिवत स्थापना व घटपूजा अतिशय प्रसन्न वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाली. गेल्या अनेक वर्षांपासून जागृती युवक मंडळाच्या माध्यमातून नवरात्रोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. मंडळात वयाने जेष्ठ व्यक्तींचा असलेल्या उत्साह युवकांना देखील लाजवेल असा असतो. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, देखाव्यांची आरास, विविध उपक्रम राबविणे याबाबतीत मंडळाची चौफेर ख्याती आहे. परंतु कोरोनाच्या परिस्थितीत हा नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा केला जात आहे. आज घटस्थापनेच्या निमित्ताने जागृती युवक मंडळ (मरीमाता मंदिर परिसर) येथे विधिवत पूजा कॉन्ट्रॅक्टर भगवान महाजन यांच्या हस्ते संपन्न झाली. याप्रसंगी भानु आबा, मंडळाचे जेष्ठ सदस्य पांडुरंग मराठे, अरुण पाटील, कडू रूपा महाजन, पुंडलिक माळी, शांताराम महाजन, जागृती युवक मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील, आनंद पाटील, लक्ष्मण पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते.