जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसी परीसरात समृद्धी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सुबोनीयो केमिकल्स फर्मास्युटिकल्स या दोन कंपनीमधून बनावट बिलं तयार करत ९ जणांनी तब्बल ४६ लाख ८७ हजार ७५२ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुबोध सुधाकर चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचे बंधू सुनील चौधरी यांची अनुक्रमाने एमआयडीसी परीसरात समृद्धी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सुबोनीयो केमिकल्स फर्मास्युटिकल्स या दोन कंपनी आहेत. दोन्ही कंपन्या या आजुबाजुस असून कंपनीत खते व रसायने बनविले जातात. दोन्ही कंपन्याचे कामकाज हे सुनिल यांच्या कंपनीत असलेल्या ऑफीस मधुन करण्यात येते. व त्या कामी लागणारा स्टॉफ हा एकच आहे.
दोन्ही कंपनीचे कामकाज पाहण्यासाठी ऑफीस स्टॉफ एकच असून कंपनीत सिनीयर अकाउंटट म्हणून मेघा भुषण खैरनार (रा. ज्ञानदेव नगर, खेडी रोड, जळगाव ह.मु. 74, मारोती पेठ, मुंजोबा मंदीराजवळ, जुने जळगाव) ह्या सुमारे 2018 पासुन कामास होती. तिच्याकडे मालकांनी सांगीतल्याप्रमाणे कंपनीत माल पुरवठा करणा-या व्यापा-यांची नोंद घेणे, संगणकामध्ये त्या व्यापारांचे नाव व व्यवहार सामील करणे, नविन व्यापा-याचे जी.एस.टी. नंबर, आधारकार्ड, पॅनकार्ड तपासून त्यांच्या व्यापाराबाबत पुष्टी करुन मालकांची संमती व परवानगी घेवुनच कंपनीच्या स्वॉपटवेअरमध्ये अॅड करण्याचा अधिकारा तिच्याकडे होता. तसेच इतर स्टॉफ च्या कामाच्या जबाबदारी नुसार सिस्टमच्या टॅली सॉफ्टवेअरमध्ये विशीष्ट अॅक्सेस देण्याचा अधिकार तिचाकडे होता. ती दिनांक 17 जुलै 2022 रोजी पासुन दिड महीण्याची रजा घेवुन गेली होती. त्यानंतर ती परत कंपनीत कामास आली नव्हती. दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी ई मेलद्वारे तिने राजीनामा पाठविला. आम्ही तिला राजीनामा का दिला?, बाबत विचारले असता तिने आमच्यावर आक्षेप घेऊन महीलांना व्यवस्थीत वागणुक देत नसल्याचे सांगत राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर तिने आज पावेतो कंपनीसोबत संर्पक केलेला नाही.
चौधरी बंधूंच्या कंपनीत सहाय्यक अकाउंटट म्हणुन वैष्णवी शरद महाजन (रा. तळेले कॉलनी, जुना खेडी रोड, रमनीश बंगल्याजवळ, जळगाव) ही डिसेंबर 2019 पासुन काम करत होती. तिच्याकडे दोन्ही कंपनीत झालेल्या संपुर्ण व्यवहाराचे चेक काढण्याचे व चेक मिळण्याची पोहच पावती जमा करण्याची तसेच दर दिवशी बँकेचे खाते चेक करणे, बँक बॅलन्स मेंटन करणे अशी संपूर्ण जबाबदारी होती. चेक हे आमच्यावर नमुद अकाउंट वरुन कॉम्पुटरमध्ये चेकवर व्यापा-याचे नाव टाकुन प्रिंट काढणे, चेक काढणे तसेच सिनीयर अकाउंट खैरनार हिने रजीस्टर केलेल्या नावानुसार संबंधीत व्यापा-याच्या नावाने चेक मालकाच्या आदेश मिळाल्या नंतरच काढण्याचे काम करीत होती. वैष्णवी महाजन हिने दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी पासून राजीनामा दिलेला आहे. कंपनीत विशाल पोपट डोके (रा. रामेश्वर कॉलनी, एम. डी. एस. कॉलनी, जळगाव) हा 2019 ऑफीस बॉय म्हणुन नोकरीस होता. वैष्णवी महाजन यांनी काढलेले चेकवर चौधरी बंधूंच्या सह्या घेणे व सदरचे चेक संबधीत व्यापा-यापर्यंत पोहचविण्याचे काम, व्यापा-यांना चेक दिल्यानंतर त्याच्याकडून रिसीव्हर व्हाउचर घेणे व ऑफीस मधील इतर काम तो करीत होता.
दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वा चौधरी बंधूनी कंपनीच्या कार्यालयात असतांना अकाउंट संबधी फाईल चेक केली तेव्हा त्यांच्या असे निर्देशनास आले की, कंपनीशी संबधीत नसलेला व आमचा व्यापार नसलेला ब-याच इसमांना जनता सहकारी बँक लिमीटेड या बँकेत असलेल्या खात्यातून चेक वटविले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनी सिस्टीममध्ये चेक केले असता त्यांच्या असे निर्दशनास आले कि, समृध्दी केमीकल प्रा. लिमी च्या नावाने असलेल्या खात्यामधून 1) संजय मणिलाल छेडा यास दिनांक 21 जून 2022 रोजी ते दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी पावेतो 20 चेक द्वारे 11 लाख 34 हजार रुपये, 2) लतीफ कमरुद्दीन पिंजारी यास दिनांक 3 मार्च 2022 ते दिनांक 2 जुलै 2022 रोजी पावेतेा 10 चेक द्वारे 4 लाख 14 रुपये, 3) रिषीकेश रावसाहेब पाटील यास दिनांक 24 मे 2022 ते दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी पावेतो 6 चेकद्वारे 2 लाख 74 हजार 809 रुपये, 4) पुनमचंद रामेश्वर पवार यास दिनांक 3 मार्च 2022 ते दिनांक 4 मे 2022 रोजी पावेतो 8 चेकद्वारे 2 लाख 67 हजार 700 रुपये, 5) प्रल्हाद सुनिल माचरे यास दिनांक 6 ऑगस्ट 2022 ते दिनांक 18 जुलै 2022 रोजी पावेतो 6 चेक द्वारे 2 लाख 66 हजार 48 रुपये 6) अविनाश कोमल पाटील यास दिनांक 20 एप्रिल 2022 ते दिनांक 17 मे 2022 रोजी पावेतो 5 चेकद्वारे 2 लाख 22 हजार 700 रुपये, 7) विनोद प्रभाकर सोनवणे यास दिनांक 5 जुलै 2022 रोजी 2 चेकद्वारे 87 हजार रुपये, 8) मयुर जमनादास बागडे यास दिनांक 3 मार्च 2022 रोजी 2 चेकद्वारे 83 हजार रुपये, 9) विजय आनंदा सैंदाणे यास दिनांक 9 जुलै 2022 रोजी 1 चेकद्वारे 46 हजार 100 रुपये असे सुबोध चौधरी यांच्या खात्यात खात्यातून एकुण 28 लाख 22 हजार 371 रुपयाचे चेक वटविल्याचे दिसले.
यापैकी रिषीकेश रावसाहेब पाटील याने त्याचे खात्यात ट्रान्सफर झालेले 2 लाख 74 हजार 809 रुपये व विनोद प्रभाकर सोनवणे याने त्याचे खात्यात ट्रान्सफर झालेले 87 हजार रुपये हे रोख स्वरुपात दिलेले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध सुबोध चौधरी यांची काहीएक तक्रार नाही. तसेच त्यांच्या कंपनीशी यापुर्वी व्यवहार असलेले 1) अनिल रामदास चौधरी यास दिनांक 6/10/2021 ते दिनांक 15/02/2022 रोजी पार्वतो 17 चेक द्वारे 6 लाख 97 हजार 500 रुपये, 2) विजय विश्वनाथ देशमुख यास दिनांक 15/02/2022 ते दिनांक 17/02/2022 रोजी पावेतो 3 चेकद्वारे 1 लाख 37 हजार 543 रुपये 3) बबलु जगदीश बंजारी यास दिनांक 15/02/2022 ते दिनांक 24/02/2022 रोजी पावेतो 3 चेकद्वारे 1 लाख 35 हजार 142 रुपये 4) सुनिल किसन चौधरी यास दिनांक 15/02/2022 रोजी 2 चेकद्वारे 90 हजार 552 रुपये असे एकुण 10 लाख 60 हजार 737 रुपयाचा चौधरी बंधूंचा त्यांच्याशी कुठलाही व्यवहार नसतांना खात्यातून बेरर चेकद्वारे वटविल्याचे दिसले.
तरी दिनांक 6/10/2021 रोजी ते दिनांक 16/09/2022 रोजी पावेतो वेळोवेळी समृद्धी केमिकल्स आणि सुबोनीयो केमिकल्स फर्मास्युटिकल्समध्ये काम करणारा ऑफीस बॉय विशाल पोपट डोके, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव याने माझे कंपनीशी व्यवहार नसलेले इसम 1) संजय मणीलाल छेडा, रा. गणेश कॉलनी, जळगाव याचे नावाने 11,34,000/- रुपयाचे, 2) लतीफ कमरुद्दीन पिंजारी, रा. पिंप्राळा, जळगाव याचे नावाने 4,41,014/- रुपयाचा, 3) पूनमचंद रामेश्वर पवार, रा. सिंधी कॉलनी, जळगाव याचे नावाने 2,67,700/- रुपयाचा, 4) प्रल्हाद सुनील माचरे, रा. शिवाजी नगर जळगाव याचे नावाने 2,66,048/- रुपयाचा 5) अविनाश कोमल पाटील, रा. पिंप्राळा जळगाव याचे नावाने 2,22,700/- रुपयाचा 6) मयूर जमनादास बागडे, रा. जाखनी नगर, कंजरवाड़ा, जळगाव याचे नावाने 83,000/- रुपयाचा, 7) विजय आनंदा सैंदाणे, रा. सुप्रीम कॉलनी जळगाव याचे नावाने 46,100/- रुपयाचा असे एकुण 24,60,562/- रुपयाचे वेळोवेळी बनावट बिल तयार करुन तसेच भाऊ सुनिल चौधरी यांचे सुबोनियो केमकल प्रा. लिमी. या कंपनीशी व्यवहार नसलेले इसम 1 ) लतीफ कमरुद्दीन पिंजारी, रा. पिंप्राळा, जळगाव याचे नावाने 4,31,710/- रुपये 2) प्रल्हाद सुनिल माचरे, रा. शिवाजी नगर जळगाव याचे नावाने 2,69,807/- रुपये, 3) पुनमचंद रामेश्वर पवार, रा. सिंधी कॉलनी, जळगाव याचे नावाने 2,21,292/- रुपये, 4) अविनाश कोमल पाटील, रा. पिंप्राळा जळगाव याचे नावाने 2,17,200/ रुपये, 5) मयुर जमनादास बागडे, रा. जाखनी नगर, कंजरवाडा, जळगाव याचे नावाने 46,000/- रुपये, 7) विजय आनंदा सैंदाण रा. सुप्रीम कॉलनी जळगाव याचे नावाने 44,750/- रुपये असे एकूण 12,30,759/- रुपयाचे वेळोवेळी बनावट बिल तयार करुन सदर बनावट बिलाच्या आधारे आमच्या असलेल्या जळगाव जनता सहकारी बँक, शाखा मार्केट यार्ड, जळगाव येथे असलेल्या खात्याचे त्यांचे नावाने चेक काढुन चेक वर ऑफीस बॉय विशाल डोके याने माझ्या तशाच भाऊ सुनिल याचे सहीशी मिळती जुळती सही करुन सदरचे चेक हे वटविणे कामी बँकेत टाकुन अकाउंट पे द्वारे सदरचे चेक हे वर नमुद इसमांच्या अकाउंट वर टाकून चेक हे बटले होते व संबधीत इसमांनी देखील त्यांच्याशी आमचा कुठलाही व्यवहार नसतांना सदर आमचे चेक स्विकारुन विशाल यास अपराध करणेकामी सहाय्य केले हेाते
तसेच ऑफीस बॉय विशाल डोके याने माझ्या कंपनीशी यापुर्वी व्यवहार असलेले 1) अनिल रामदास चौधरी याचे नावाने 6,97,500/- रुपये, 2) विजय विश्वनाथ देशमुख याचे नावाने 1,37,543/- रुपये, 3) बबलु जगदीश वंजारी याचे नावाने 1,35,142/- रुपये, 4) सुनिल किसन चौधरी याचे नावाने 90,552/- रुपये असे एकुण 10,60,737/- रुपयाचे तसेच भाऊ सुनिल चौधरी याचे कंपनीशी यापुर्वी व्यवहार असलेले 1) विजय विश्वनाथ देशमुख याचे नावाने 90,552/- रुपये, 2) सुनिल किसन चौधरी याचे नावाने 89,866/- रुपये, 3) विनोद गणेश रुढे याचे नावाने 81,000/- रु. 4) बबलू जगदीश वंजारी याचे नावाने 45,276/- रुपये, 5) अनिल रामदास चौधरी याचे नावाने 45,000/- रुपये असे एकुण 3,51,694/- रुपयांचे दोन्ही कंपन्याचे नावाने एकुण 14, 12,431/- रुपयांचे बनावट बिल तयार करून सदर बनावट बिलाच्या आधारे आमचे दोन्ही भावांचे खाते असलेल्या जळगाव जनता सहकारी बँक प्रा. लिमी., मार्केट यार्ड शाखा, जळगाव येथील खात्यातून त्यांचे आधी अकाउंट पेयी चेक काढुन त्यावर अकाउंट पेयी च्या चिन्हाच्या जागी सही करुन सदरचे चेक हे बेरर करून त्या बेर चेक वर आमच्या बनावट सह्या करून सदरचे चेक हे बँकेतुन आमचे कडेस काम करणार ऑफीस बॉय विशाल पोपट डोके याने वटवुन घेवुन अपहार केला असुन माझ्या कंपनीतून एकुण 31,05,299/- रुपयाचा तसेच भाऊ सुनिल चौधरी याचे कंपनीतून 15,82, 453/- असा आमच्या दोन्हीच्या कंपनीतून एकुण 46,87,752/- रु चा अपहार केला आहे. तसेच सदरचा अपहार करणेकामी विशाल पोपट पोटे, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यास आमचे कडेस काम करणारी सिनीयर अकाउंटट मेघा भुषण खैरनार, रा. ज्ञानदेव नगर, खेडी रोड, जळगाव ह.मु. 74, मारोती पेठ, मुंजोबा मंदीराजवळ, जुने जळगाव, जळगाव हिने सदर अपहार करणे कामी सिस्टीम मध्ये आमचेशी व्यापार नसलेल्या लोकांचे नाव घेवुन त्यास अपहार करणे कामी सहाय्य केले आहे. तसेच त्यांनी सदरचा अपहार हा संगणमताने केला आहे. म्हणुन माझी त्यांचे विरुध्द कायदेशीर फिर्याद आहे, अशी तक्रार एमआयडीसी पोलिसात देण्यात आली असून पुढील तपास पीएसआय निलेश गोसावी हे करीत आहेत.