नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात ५० हजारांहून कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भावात जरी घट दिसत असली तरी अद्याप संकट पूर्णपणे टळलेलं नाही. गेल्या २४ तासांत ४६ हजार ६१७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४६ हजार ६१७ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ५९ हजार ३८४ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील एकूण बाधितांची संख्या ३,०४,५८,२५१ झाली असून, आजपर्यंत २,९५,४८,३०२ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ५,०९,६३७ आहे. तर, आजपर्यंत देशात ४,००,३१२ रूग्ण कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
याशिवाय देशभरात आजपर्यंत ३४,००,७६,२३२ जणांचे लसीकरण झाले आहे. देशभरात १ जुलैपर्यंत ४१,४२,५१,५२० नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी १८,८०,०२६ नमुने काल पॉझिटिव्ह आढळले आहेत.