मुंबई(वृत्तसंस्था) : राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर पहिल्यादाच पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आज ‘५० खोके एकदम ओके’ घोषणा देत असताना हि घोषणा सत्ताधाऱ्यांना चांगलीच झोंबल्याने काही आमदार विरोधकांवर आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर चांगलेच तुटून पडल्याचे चित्र आज राज्याला पहायला मिळाले आहे. तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे गोंधळाचं वातावरण चांगलेच तापलं होतं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठाकरे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करत आहे. त्याचवेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे त्यांच्या समर्थक आमदारांसह आले. ठाकरे गट आणि शिंदे गटाचे आमदार आमने सामने आले.
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. डरपोक आहोत काय? असं भरत यांनी म्हटलं आहे. शिंदे गटातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या नादी लागू नका असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे. हा फक्त ट्रेलर होता अजून अख्खा सिनेमा बाकी आहे.
विरोधकांनी ५० खोके एकदम ओके म्हणत शिंदे गटातील आमदारांना डिवचण्याचा गेले काही दिवस प्रयत्न केला होता. त्यानंतर या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिंदे गटातील आमदार विधीमंडळ्याच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते
कर नाही त्याला डर कशाला असंही भरत गोगावले म्हणाले. विधिमंडळाबाहेर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडल्याने गोंधळ उडाला. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत हा गदारोळ सुरू झाला.