TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणूक : जातीयवादी पक्षांसोबत निवडणूक लढविणार नाही ; काँग्रेसने फेरले सर्वपक्षीय पॅनलवर पाणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक प्रक्रिया सुरू असतांना जिल्हा काँग्रेसने सर्वपक्षीय पॅनलवर पाणी फेरले आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जिल्ह्यातही हेच सुत्र कायम ठेऊन जिल्हा बँकेसाठी महाविकास आघाडी म्हणून पॅनल होत असेल तर आमची तयारी आहे. या पॅनलमध्ये भाजपाचा समावेश असुन जातीयवादी पक्षांसोबत आम्ही निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

महाविकास आघाडी म्हणून आमची तयारी आहे. मात्र तसे न झाल्यास आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय पॅनलची मोट बांधली होती. जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांचा समावेश असलेली समितीही निश्‍चित करण्यात आली होती. यात काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्यासह आताचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांचा समावेश आहे. मागील आठवड्यात या समितीची बैठक होऊन भाजपा ७, राष्ट्रवादी ७, शिवसेना ५ आणि काँग्रेस २ असे जागावाटप ठरले होते. या जागा वाटपाला अंतीम स्वरूप मिळत नाही तोच जिल्हा काँग्रेसने पुन्हा एकदा कोलांटउडी घेत स्वबळाचा नारा दिला आहे.

READ ALSO

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आले होते. या पॅनलच्या कोअर कमिटीची बैठकही पार पडली. यात जे जागा वाटप झाले त्याबाबत आम्हाला कुठलीही माहिती पालकमंत्र्यांकडून देण्यात आली नाही. आम्हाला बातम्यांच्या आधारे या जागा वाटपाची माहिती मिळाली. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जिल्ह्यातही हेच सुत्र कायम ठेऊन जिल्हा बँकेसाठी महाविकास आघाडी म्हणून पॅनल होत असेल तर आमची तयारी आहे. जातीयवादी असलेल्या भाजपासोबत आम्ही जाणार नाही. सत्ताधारी मित्रपक्षांना आम्ही विनंती करणार असुन विनंती मान्य न झाल्यास आम्ही जिल्हा बँकेची निवडणुक स्वबळावर लढु अशी घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती

यावेळी पत्रकार परिषदेस जामनेर तालुकाध्यक्ष शरद पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष संतोष पाटील, एरंडोल विधानसभा अध्यक्ष इमरान मुश्ताक, रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, चाळीसगाव आबासाहेब निकम, पारोळा तालुकाध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान, जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, भडगाव शहराध्यक्ष दिलीप शेंडे, बोदवडचे दिलीप पाटील, मुक्ताईनगरचे डॉ. जगदीश पाटील, पाचोराचे सचीन सोमवंशी, मनोज सोनवणे, ज्ञानेश्‍वर कोळी, उध्दव वाणी आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापौरांच्या मागणीला यश : पालकमंत्री डीपीडिसीतून देणार १० कोटींचा निधी !

January 29, 2021

शहरी भागात स्मार्ट मीटर बसवावेत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 29, 2022

अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी पोलखोल करणार : किरीट सोमय्या

October 10, 2021

मराठे गावाजवळ गांजा तस्करला पकडले ; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई !

October 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group