जळगाव (प्रतिनिधी) येथील इकरा शिक्षण संस्था तसेच दैनिक लोकमत व एच. जे. थीम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमत रक्ताच नात’ अभियानाच्या अंतर्गत महारक्तदान शिबिराचे मेहरूण कॅम्पस येथे आयोजन करण्यात आले. कोरोनामुळे शैक्षणिक संस्था बंद असूनही ५१ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व काही विद्यार्थ्यांनी शिबिरात उतस्फुर्तपणे रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. करीम सालार होते. आपल्या मार्गदर्शनात डॉ. करीम सालार म्हटले की, “सर्व दानात श्रेष्ठ रक्तदान आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान होय. त्यामुळे ते महादान आहे. तसेच देशातील विष पसविणाऱ्या विरुद्ध रक्तदान हेच उत्तर आहे, रक्ताच नात. रक्तदानामुळे आपले बरेचसे विकार दूर होतात”. उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राउत उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षा रोपण सुद्धा करण्यात आले. तसेच त्यांनी इकरा शिक्षण संस्थेने कोरोना आपत्ती काळात केलेल्या कार्याची प्रशंसा करून अभिनंदन केले. कोरोनामुळे शैक्षणिक संस्था बंद असूनही ५१ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व काही विद्यार्थ्यांनी शिबिरात उतस्फुर्तपणे रक्तदान केले. रक्त संकल्पनाकरीता इंडियन रेड क्रॉस सोसायटीने सहकार्य केले. शिबिरात सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा रक्तदान केले.
शिबिरात इकरा शिक्षण संस्थेचे कार्यकारणी सदस्य सचिव एजाज अब्दुल गफ्फार मलिक, उपाध्यक्ष डॉ. इकबाल शाह, माजी प्राचार्य रऊफ शेख, डॉ. अमानुल्ला शाह, अमीन बाद्लीवाला, अब्दुल रशीद शेख, अब्दुल नबी बागबान, अजीज सालार, प्रो. जफर शेख, गनी मेमन, तारीक अन्वर, डॉ. कारी कदूस, डॉ. शोएब, मुफ्ती हारून नदवी, रिझवान फलाही, मेहरूणचे नगरसेवक युसुफ दादा, अक्रम देशमुख, निजाम पहेलवान, प्राचार्य जुबेर मलिक, मो. सलीम शाह, जमीर अश्रफ, अय्युब शेख यांची उपस्थिति उल्लेखनीय होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करीता राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजु गवरे, उपप्राचार्य प्रा. आय. एम. पिंजारी, डॉ. युसुफ पटेल, डॉ. चांद खान, डॉ. राजेश भामरे, डॉ. तनवीर खान, डॉ. शबाना खाटिक, प्रा. कहेकशा अंजुम, प्रा. फरहान शेख यांनी परिश्रम घेतले. सदर शिबिरात इकरा शाहीन प्रायमरी स्कूल, इकरा शाहीन हायस्कूल व जुनिअर कॉलेज, इकरा डी.एड. कॉलेज, इकरा बी.एड. कॉलेज, इकरा यूनानी मेडिकल कॉलेज, इकरा पब्लिक स्कूल, इकरा प्रताप नगर विद्यालय, इकरा सालार नगर हायस्कूल, इकरा आय. टी. आय. च्या समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सैय्यद शुजाअत अली यांनी मार्गदर्शन केले.
















