जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव येथील तरुण कामानिमित्त २८ मे रोजी आलेला होता. यावेळी रिक्षाने प्रवास करत असताना त्याच्या खिशातील ५५ हजार रुपये लांबविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात रुपेश रमेश भाटीया (रा. भाटीया गल्ली) हा तरुण २८ मे रोजी दुचाकी घेण्यासाठी जळगावात आला होता. परंतू दुचाकी काही कारणाने न घेता परत जायला निघाला. अजिंठा चौफुलीवरून रिक्षात बसल्यानंतर रुपेश खोटे नगर स्टॉपला उतरला. उतरल्यावर रुपेशच्या लक्षात आले की, त्याच्या खिशातील ५५ हजार रुपये गायब झाले आहेत. रिक्षात बसलेले दोन पुरुष आणि एका महिलेवर संशय होता. तशात माध्यामातून एलसीबीने दोघांना पकडल्याचे वृत्त रुपेशने बघितले आणि ते दोघं जण तेच असल्याची खात्री झाली. त्यानुसार सोमवारी रुपेश भाटीया याच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. रेवानंद साळुंखे हे करीत आहे.















