जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील एका ३७ वर्षीय घटस्फोटीत महिलेची विवाह नोंदणी साईटवरून माहिती घेत तिच्याशी लग्न करून सहा लाख रूपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार दि. ३० जुलै रोजी रात्री ११ वाजता समोर आला आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाह नोंदणी साईटवरून घटस्फोटीत महिलांची माहिती घेत पंकज रमेश पाटील याच्यासह, त्याची आई रंजना रमेश पाटील, रमेश माधव पाटील, प्राजक्ता अमित डेंगाणे व अमित डेंगाणे सर्व राहणार (रा. ओव्हळ, जि. पालघर) या पाच जणांनी जळगावातील एका भागात राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेची माहिती घेतली. तिच्या मुलांनाही संभाळण्याचे आश्वासन देत पंकज पाटील याने या महिलेशी फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्न केले. त्यानंतर या महिलेची सहा लाख रुपयांमध्ये फसवणूक करीत तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. जळगावातील महिलेशी लग्न केल्यानंतर तिला समजले की, त्याची एक पत्नी जिवंत असताना इतर चार महिलांशीही त्याने लग्न केले आहे.हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत महिलेने मंगाकर दि ३० जुलै रोजी रात्री ११ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात फियांद दिली. त्यावरून करील पाच जणांविरुद्ध गुना पखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि करव्याणी वर्मा करीत आहेत