जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. यांच्या अंतर्गत जळगाव जिल्हा सहकारी बोर्ड लि. सहकार प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त सहकार्याने ६७ वा सहकार सप्ताह उदघाटन कार्यक्रम करण्यात आला.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्या शुभ हस्ते सहकार ध्वजारोहण करून संपन्न झाला. या कार्यक्रमास जिल्हा सहकारी बोर्ड चे संचालक डॉ वसंतराव देशमुख, किरण साळुंखे, प्रमोद पाटील, संचालक जळगाव जिल्हा सहकारी बोर्ड लि. जळगाव. याप्रसंगी जळगाव जिल्हा सहकारी बोर्ड संचालक सुदाम पाटील कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले. प्राचार्य चौधरी सहकार सप्ताह रूपरेषा सादर केली. तर जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक किरण साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन जळगाव जिल्हा सहकारी बोर्ड संचालक मनोहर सदाशिव यांनी केले. कार्यक्रमास जळगाव जिल्हा सहकारी बोर्डाचे सहकार शिक्षणाधिकारी राजेंद्र पवार, कनिष्ठ लिपिक साळुंके, जितेंद्र सुर्वे यांनी बहुमोल सहकार्य केले. सदर कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.