चोपडा ( प्रतिनिधी ) NMMS परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी देखील घवघवीत यश प्राप्त करत विवेकानंद विद्यालयातील आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले.
चौधरी पियुष सुरेश, चौधरी श्रीकांत प्रशांत, बाविस्कर खुशी योगेश, पवार खुशी मनोज, देशमुख विराज योगेश, बडगुजर किमया निमेश, कापुरे वेदश्री किरण, जोशी सर्वेश कल्पेश यांना विद्यालयाचे उपशिक्षक पवन लाठी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक व त्यांच्या पालकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड.रविंद्र जैन, सहसचिव डॉ.विनित हरताळकर, मुख्याध्यापक व विश्वस्त नरेंद्र भावे यांच्या सह सर्व विश्वस्त मंडळ, सर्व शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद, पालकवृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.