मुसळी (प्रतिनिधी) येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीने आयोजित केलेल्या सात दिवसीय शिव जयंती सोहळ्याच्या प्रथम दिवसाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने संपन्न झाला.
या दिवशी शिवपुजन व भंडारा गावजेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप गुलाबराव पाटील, भानुदास भागवत पाटील, अनिल शिवनारायण पाटील, जितेंद्र जी कोठारी, धरणगावचे पीआय पवन देसले, मुकुंद ननवरे, नरेंद्र शिंदे, ह.भ.प. गायत्री पाटील, पि.के. पाटील, सुरेखा सुरेश गुंजाळ, कैलास पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करून झाली. यानंतर, लिटल चॅम्स स्कूल आणि पिंप्री शाळेतील लहान चिमुकल्यांनी ‘शिवराज्याभिषेक’, ‘प्रतापगडचा संग्राम’ या ऐतिहासिक घटनांचा जिवंत देखावा सादर केला, ज्याने उपस्थितांना आनंदित केले.
यानंतर, मंडळाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या वेळी प्रतापराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले. शेवटी, जिजाऊ वंदना व शिवरायांची आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.