नंदुरबार (वृत्तसंस्था) विसरवाडी नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील एका व्यापाऱ्याच्या घरी मध्यरात्री पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला, परंतु १३ वर्षीय मुलीने दाखवलेल्या धाडसामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला आणि पाचपैकी चार दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले. तर एक संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाला. दिशा अग्रवाल असे धाडस दाखवलेल्या मुलीचे नाव आहे. दिशाचे दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून नवदुर्गामुळे कुटुंबावर आलेले मोठे संकट टळले आहे.
नवापुर तालुक्यातील विसरवाडी गावात रात्री २ वाजेच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी व्यापारी मुन्ना अग्रवाल यांच्या घरी सशस्त्र दरोडा घातला. यावेळी अग्रवाल दाम्पत्य बेडरूममध्ये झोपलेले असताना या पाचही दरोडेखोरांनी घरातील सामानाची नासधूस करत अग्रवाल दांपत्यास मारहाण केली. हाता-पायाला दोरीने वोडाला रुमाल बांधून त्यांच्या घरातील कपाट, लॉकर, पलंग व इतर सामान अस्ताव्रत केले. भयभीत दांपत्याने त्वंच्याकडील सर्व रोखी दागदागिने दरोडेखोरांना सुपूर्त केले, तरी देखील दरोडेखोरा मारहाण करीतच होते. बेडरूममध्ये झोपलेली अग्रवाल यांची मुलगी दिशाला आपल्या घरात काहीतरी येत असल्याने कोणीतरी घरात घुसल्याचा अंदाज आला.
दुसऱ्या खोलीत झोपलेल्या दिशाला आरड्याओरड्याच्या आवाजाने अचानक जाग आली. बाहेर येऊन पाहिले असता तिलो दरोडेखोर आई-वडिलांना मारहाण करताना आणि मौल्यवान माल लुटताना दिसले. भयावह दृश्य पाहूनही घाबरून न जाता दिशाने कसा तरी घराबाहेर पळ काढला. एवढ्या रात्री घरातून बाहेर निघताना तिने घराचा मुख्य दरवाजा बाहेरून बंद करून घेतला. कोणत्याही गोष्टीची भीती न बाळगता दिसणे ग्रामपंचायत गल्लीत असलेल्या आपले मोठे काका व्यापारी सचिन अग्रवाल यांचे घर गाठले आणि सर्व हकीगत सांगितली. सचिन अग्रवाल यांनी लागलीच विसरवाडी पोलीस स्टेशन तसेच शेजारील मित्र मंडळी यांना कळवले. त्यामुळे विसरवाडी पोलिस व परिसरातील सतर्क नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांचे पथक पाहून दरोडेखोरांनी निसटण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे कोयता, टॉमीसह इतर शस्त्र होते. पाच दरोडेखोरापैकी दोघांना घरातून तर दोन आजूबाजूच्य परिसरात दबा धरून बसलेले असताना पोलिसांनी पकडले. तर एक संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाला. पोलिसांनी एकूण ४ शसस्त्र दरोडेखोरांना ताब्यात घेतलं. यामुळे अग्रवाल परिवाराचे संकट टळलं.यामुळे धाडशी मुलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या घटनेतील दरोडेखोर हे अनेक दिवसापासून स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने परिसरातील सर्व माहिती घेत असल्याचे समोर आले आहे. अधिक चौकशी करण्यासाठी नंदुरबार फॉरेन्सिक पोलीस पथक फिंगरप्रिंट सहाय्यक पोलीस निरीक्षक व वाळके, संजय रतन रामोळे तसेच श्वान पथक ये हेडकॉन्स्टेबल गोविंद गावित, डेडकॉन्स्टेबल भिमसिंग गावित पोलीस नाईका पुरुषोत्तम साठे आणि डॉग लकी यास पाचारण करण्यात आले होते.