भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय विधवेचा एकाने मारहाण करीत विनयभंग केल्याची तक्रार वरणगाव पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय विधवा वास्तव्यास आहे. ती दि ६ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास खालच्या गावातून किराणा सामान घेत घरी येत होती. संशयित आरोपी युवराज गणपत पवार याने महिलेसोबत अश्लील संवाद साधला. पिडीत महिलेने विरोध केला असता तिच्या घरी जात संशयित आरोपी युवराज पवार याने पिडीतेला शिवीगाळ करीत मारहाण करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी संशयित आरोपी युवराज पवार याच्या विरोधात वरणगाव पोलिसात दि ६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोहर पाटील हे करीत आहेत.