जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजित विवाह सोहळ्यातून 3 लाख 54 हजार 500 रुपये किमतीचा सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime News)
जळगाव शहरातील हॉटेल कमल पॅरेडाईज या लॉनवर 26 जानेवारी रोजी रात्री विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्याला मनोज विक्रम कोळी हे सपत्नीक हजर होते. लॉनवरील स्टेजवर दोघे पती पत्नी हजर असतांना त्यांच्या ताब्यातील दिड लाख रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, 1 लाख 20 हजार रुपये रोख, 84 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन तसेच पाचशे रुपये किमतीची पर्स असा एकुण 3 लाख 54 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने लांबविला. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक किरण पाठक हे करत आहेत.