चोपडा (प्रतिनिधी) शहरातील रामकुंवर नगर भागात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून तब्बल तीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
शहरात चोरीचे सत्र सुरूच असून धनवाडी रस्त्यालगत असलेल्या रामकुंवर नगर भागातील प्लॉट नंबर २३ येथील ज्ञानेश्वर बाबुलाल पाटील यांचा घराच्या मागील खिडकीचे ग्रिल कापून घरात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी साडेचार तोळे सोने व ४७ हजार रुपये रोख असा अंदाजे ३ लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.
चार अज्ञात चोरट्यांनी रक्कम घेऊन पळत असताना घरमालकाने आरडाओरड केली म्हणून म्हणून चोरट्यांनी घरमालकाचा अंगावर दगडफेक करून पळ काढला. घटनास्थळी प्रभारी पोलिस निरीक्षक कावेरी महादेव कमलाकर, उपनिरीक्षक अजित सावळे यांनी भेट देत कर्मचाऱ्यांना तपासाबाबत सूचना केल्यात. या धाडसी चोरीमुळे पुन्हा कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
















