जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नागझीरा फाट्याजवळ मंदीरातून दर्शन घेवून येणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरी हिसकावून चोरी करणाऱ्या दोघांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात राहणाऱ्या कलाबाई लक्ष्मण सोनवणे वय ५३ या महिला सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गिरणा नदीकाठावरील नागाई जोगाई मंदीराचे दर्शन घेवून सुन दिपाली सोनवणे आणि जेठाणी सुनंदाबाई सोनवणे यांच्यासोबत पायी येत असतांना नागझीरा फाट्याजवळ संशयित आरोपी अमर ताराचंद मोरे वय ३२ आणि निलेश अरूण सोनवणे दोन्ही रा. भातखंडा ता पाचोरा यांनी कलाबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून चोरून पसार झाले. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता कलाबाई सोनवणे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमर ताराचंद मोरे वय ३२ आणि निलेश अरूण सोनवणे दोन्ही रा. भातखंडा ता पाचोरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अमर मोरे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुर्यकांत नाईक हे करीत आहे.