चोपडा (प्रतिनिधी) चोपडा नगरपरिषद व शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी माती, माझा देश’ मातृभूमीला नमन, वीरांना वंदन”उपक्रमांतर्गत देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ चोपडा शहरात दि.१३ऑगष्ट २०२३रोजी सकाळी ७ वाजता भव्य सायकल रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. तरी शहरातील सामाजिक संस्था, प्रत्येक विभागातील प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, व्यापारी, पत्रकार, राजकीय कार्यकर्ते, महिला,युवा विद्यार्थी वा जनतेने मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, राज्य घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मालर्पण करण्यात आले.तसेच भारत मातेच्या पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी हेमंत निकम व शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांनी केले आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.नि. कावेरी कमलाकर,सहा. पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, उपमुखधिकारी निलेश ठाकूर, ए.पी.आय. अजित साबळे, घनश्याम तांबे, वसावे, मेडिकल असो.चे अध्यक्ष डॉ. भरत पाटील, डॉ.शरद पाटील, सायकल रायडर्स ग्रुपचे अध्यक्ष उदय पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष चेतन टाटीया,दिशा फाऊंडेशनचे पंकज पाटील, व तालुक्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिक, आदी मान्यवर उपस्थित होते.
सायकल रॅलीचे मार्ग ग्रामिण पोलिस स्टेशन मार्गे छत्रपती शिवाजी चौक, महात्मा गांधी चौक, मेन रोड, आझाद चौक, पंकज नगर, धरणगाव नाका, छत्रपती शिवाजी चौक येथे समारोप करण्यात आला. तदपूर्वी उपस्थितांनी माती हातात घेऊन देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी शपध घेण्यात आली. स्वातंत्र्य सैनिकाच्या हस्ते तिरंगा रंगाचे फुगे आकाशात सोडून रॅलीचे अधिकृत उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमात देशभक्ति गीताचे गायन पंकज पाटील,प्रीती पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ नेवे यांनी केले.