TheClearNews.Com
Thursday, January 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जुन्या वादाची खुन्नस ठेवून फायनान्स कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून

vijay waghmare by vijay waghmare
December 20, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : एकाच कंपनीत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मित्रांमधील वादाने एकाचा मृत्यू घेतला आहे. जुन्या भांडणाची मनात खुन्नस धरून, एका फायनान्स कर्मचाऱ्याला बहाण्याने बोलावून त्याचा गळा आवळून निघृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. निलेश राजेंद्र कासार (वय ३०, रा. जामनेर) असे मृताचे नाव असून, त्याचा मृतदेह शिरसोली जवळील नेव्हरे धरणातून जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी निलेशच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

मयत निलेश कासार हा जळगाव येथील ‘एल अॅण्ड टी फायनान्स’ कंपनीत कार्यरत होता. याच कंपनीत काम करणारा दिनेश चौधरी (वय २०, रा. तळई, ता. एरंडोल) आणि पूर्वी याच ठिकाणी काम केलेला भूषण बाळू पाटील (वय २०, रा. पिंप्री) यांच्याशी निलेशची मैत्री होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी निलेश आणि भूषण यांच्यात किरकोळ कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते, अशी माहिती पोलीसांसह नातेवाईकांनी दिली आहे. धरणातून मृतदेह बाहेर काढला. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी संशयित आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार नेव्हरे धरणात शोध घेतला असता, पोत्यात बांधलेल्या अवस्थेत निलेशचा मृतदेह सापडला. मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता.

READ ALSO

कारमध्ये सापडली २९ लाखांची रोकड, ३ किलो चांदीसह आठ तोळे सोने

दीड वर्षांसाठी हद्दपार असलेला अमन खेकडा जेरबंद

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे. पोलिस ताफा घटनास्थळी घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक निरीक्षक अनिल वाघ यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या निघृण खुनामुळे जामनेर आणि जळगाव परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.

असा लागला गुन्ह्याचा छडा
निलेश बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी या प्रकरणी जळगाव पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. त्याचा शोध सुरू असताना निलेशची दुचाकी रामदेववाडी परिसरात बेवारस स्थितीत आढळली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली. निलेशच्या कॉल डिटेल्स काढण्यात आले, यातून त्याच्या मित्र परिवाराचा शोध घेतला असता संशयित दिनेश चौधरी आणि भूषण पाटील यांना चौकशीसाठी बोलावले. चौकशी दरम्यान पोलीसांचा त्यांच्यावर संशय बळावला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली.

कामाच्या बहाण्याने बोलावले अन् काढला काटा
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भूषणने एका फायनान्स प्रकरणाच्या मंजुरीवर चर्चा करण्याच्या बहाण्याने निलेशला शिरसोली येथे बोलावले. सोमवार, १५ डिसेंबर रोजी निलेश तेथे गेला असता, त्यांच्यात पुन्हा खडाजंगी झाली. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि संशयित आरोपी भूषण पाटील व दिनेश चौधरी यांनी दोरीने निलेशचा गळा आवळून त्याची जीवनयात्रा संपवली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह पोत्यात भरून नेव्हरे धरणाच्या पाण्यात फेकून दिला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारमध्ये सापडली २९ लाखांची रोकड, ३ किलो चांदीसह आठ तोळे सोने

January 14, 2026
गुन्हे

दीड वर्षांसाठी हद्दपार असलेला अमन खेकडा जेरबंद

January 14, 2026
गुन्हे

अजिंठा चौफुलीवरील मृत्यूचे गूढ उकलले; पैशांच्या वादातून हत्याकांड, एकाला अटक

January 14, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तरुणावर वार

January 13, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती

January 13, 2026
गुन्हे

हद्दपार गुन्हेगार दिसताच थेट कोठडी !

January 13, 2026
Next Post

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरपावली येथील उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जावेद तडवी यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार !

March 14, 2022

‘लखपती दिदी’ मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावात !

August 25, 2024

धुळे : धावत्या बसमधून पडल्याने मदतनीस ठार !

August 31, 2023

सर्वोच्च न्यायालयात ‘पेगासस’ फोन टॅपिंग प्रकरणावर गुरुवारी सुनावणी

August 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group