
जळगाव (प्रतिनिधी) : तीन दिवसांपुर्वी शिवाजी नगरत हातात तलवारी आणि गावठी कट्टा घेवून आलेल्या टोळक्याने गोळीबार केला होता. याच वादातून शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी नेहरु चौकातील एका अपार्टमेंटखाली येवून शिवीगाळ करीत गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात पुन्हा वर्चस्वाच्या वादातून टोळी युद्ध पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल जरी नसला तरी पोलिसांकडून या घटनेची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे.
पोलिसात तक्रार करणाऱ्याला मदत केल्याच्या रागातून गेल्या तीन दिवसांपुर्वी एका गटातील काही तरुणांनी तरुणाला फोनवरुन शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळातच हातात तलवारी आणि गावठी कट्टा घेवून जात केयूर पंधारे या तरुणाच्या घराबाहेर गोळीबार केल्याची घटना बुधवारी घडली होती. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची धग कमी होण्यापुर्वीच शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी शहरातील नेहरु चौकात आले. त्यांनी एका अपार्टमेंटच्या खाली येवून जोरजोरात अश्लिल शिवीगाळ करीत हवेत गोळीबार केला आणि दोघे तेथून पसार झाले.
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक गुन्हे आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची धग कमी होण्यापुर्वीच शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी शहरातील नेहरु चौकात आले. त्यांनी एका अपार्टमेंटच्या खाली येवून जोरजोरात अश्लिल शिवीगाळ करीत हवेत गोळीबार केला आणि दोघे तेथून पसार झाले.
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात गोळीबार झाल्याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरील म्हणजेच अपार्टमेंटच्या परिसरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून संशयित हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
गोळीबाराची पोलिसांकडून पडताळणी
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या फुटेजमध्ये मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास दोन दुचाकीस्वार नेहरु चौकातील अपार्टमेंटमध्ये शिरतांना दिसत आहे. ते अपार्टमेंटच्या दिशेने हातवारे करतांना देखील सीसीटीव्हीत कैद झाले आहे. परंतू त्यावर लाईट चमकत असल्यामुळे नेमका गोळीबार झाला की नाही याबाबत पोलिसांकडून पडताळणी केली जात असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर शिंपी यांनी दिली.
















