TheClearNews.Com
Sunday, November 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घर घेण्यासाठी साठविलेल्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला

vijay waghmare by vijay waghmare
November 22, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – घर घेण्यासाठी पगारातून दर महिन्याला बचत करुन जमाविलेल्या पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली दीड लाखांची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवारी दुपारी १ ते ४ वाजे दरम्यान, रामानंद नगर पोलीस ठाण्यापासून ५०० मिटर अंतरावरील पाटबंधारे विभागाच्या शासकीय निवासस्थानात घडली. दोन चोरटे तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरुन याठिकाणी येतांनाचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

शहरातील पाटबंधारे विभागात शिपाई म्हणून नोकरीस असलेले मयूर गणेश लोहरे यांचे कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शासकीय निवासस्थान मिळाले आहे. याठिकाणी ते आई, पत्नीसह वास्तव्यास आहे. त्यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्यामुळे मयूर लोहरे हे आईसह शिरपूर येथे अंत्यविधीसाठी गेले होते. तर त्यांची पत्नी या कामानिमित्त दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गावात गेलेल्या होत्या. दरम्यान, काम आटोपल्यानंतर दुपारी चार वाजता त्या घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजे कुलूप लुटलेले दिसून आले. त्यामुळे त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती तात्काळ अंत्यविधीसाठी गेलेल्या पतीला दिली.

READ ALSO

लग्नाचे अमिष दाखवित महिलेवर पाच वर्षांपासून अत्याचार

महावितरणचा वीजचोरांना दणका

चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला नाही

मयूर लोहरे यांनी घटनेची माहिती तात्काळ रामानंद नगर पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर फॉरेन्सिक पथकाला देखील पाचारण केले. पोलीस ठाण्यापासून अवघ्या ५०० मिटर अंतरावर भरदिवसा घरफोडीची घटना होत असल्याने चोरट्यांना आता पोलिसांचा धाक नसल्याचे यातून दिसून येत आहे. फॉरेन्सीकच्या पथकासह घटनास्थळहून ठसे तज्ज्ञांनी कपाटा ठेवलेली रोकड चोरतांना त्यांचे हाताचे ठसे मिळून आले. दरवाजाचे कुलूप तोडल्यानंतर चोरटे कुलूप देखील घेवून गेल्याचे लोहरे यांनी सांगितले.

सोन्याचे दागिने राहिले सुखरूप

चोरट्यांनी लोहरे यांच्या घरातून त्यांनी घर घेण्याकरीता पगारातून बचत केलेली १ लाख ५५ हजार रुपयांची रोकड लांबवून नेले. चोरट्यांनी याच कपाटातील दुसऱ्या बाजूचे कुलूपबंद लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उघडता न आल्यामुळे लोहरे यांचे सोन्याचे दागिने सुखरूप राहिले.

तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरट्यांचा शोध सुरु

पाटबंधारे विभागाचे कार्यालय असलेलय मागील बाजूस समाज कल्याण विभाचे देखील कार्यालय आहे. तसेच त्याच परिसरात हतनूर आणि पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थान देखील आहे. परंतू या ठिकाणी केवळ दोनच कुटुंब राहतात. या कार्यालयाच्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. पोलिसांनी १ ते ४ वाजेच्या दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना फुटेजमध्ये एका दुचाकीवर दोन इसम तोंडाला रुमा बांधून येतांना आणि जातांना दिसून येत आहे. हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यानुसार चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThieves target savings kept for buying a house

Related Posts

गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवित महिलेवर पाच वर्षांपासून अत्याचार

November 22, 2026
गुन्हे

महावितरणचा वीजचोरांना दणका

November 21, 2026
क्रीडा

आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत चमकलेल्या हिमाली बोरोले व ममता प्रजापत यांच्यासह शौर्य चौधरीचा गौरव!

November 21, 2026
गुन्हे

महागड्या कार चोरट्यांच्या निशाण्यावर! काचा फोडून रोकडसह वस्तू लंपास

November 20, 2026
गुन्हे

कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणारा गजाआड

November 20, 2026
जळगाव

महावितरणच्या अभय योजनेत जळगाव परिमंडलातील ३ लाख ९२ हजार ग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी!

November 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक करणार

November 21, 2020

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ; तूर खरेदी नोंदणीला मुदतवाढ!

March 27, 2025

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026

Horoscope Today 11 March 2024 : आजचे राशिभविष्य, 11 मार्च 2024 !

March 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group