धरणगाव (प्रतिनिधी) येथील मुद्रांक विक्रेता व दस्त लेखक संघटनेकडून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यात मुद्रांक विक्रेते प्रमोद मार्तंडराव साळुंखे, नितीन शांताराम पाटील, सुनील रमेश बडगुजर, रवींद्र रमेश महाजन, राजेंद्र जयसिंग मोरे, मांगो रामदास अहिरे, शेख इकबाल अहेमद, संजय पुंडलिक पाटील काशिनाथ उत्तम मराठे, अंकुश अभिमन चव्हाण, रोहिदास गंगाराम सोनवणे, विक्रमसिंह जगतसिंग पाटील, नितीनचंद्र बन्सी, अनिल गुलाबराव पाटील, गौतम विठ्ठल सपकाळे, विनायक बागुल, विलास भिक्सन पवार आदी सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाला मुद्रांक विक्रेत्यांकडून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.