भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला निलंबित केल्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील सुनील जोशी नामक कर्मचारीला निलंबित करण्यात आले आहे. या वृत्ताला पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केल्याचे कळतेय.