जळगाव (प्रतिनिधी) नशिराबाद गावातील मेन रोडवर रिक्षाचा दुचाकीला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून रिक्षाचालकाला हातातील कड्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दुपारी अडीच वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख शोएब शेख जहीर (वय २७) रा. इस्लामपूरा, नशिराबाद हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शहरातील मेन रोडवरून शेख शोएब हा रिक्षा घेवून जात असतांना त्यांच्या वाहनाचा दुचाकीला कट लागला. या कारणावरून पवन नावाच्या दुचाकीस्वाराने रिक्षा चालक शेख शोएब याला शिवीगाळ करत हातातील कळ्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी रिक्षा चालक शेख शोएब शेख जहीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी अडीच वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ राजेंद्र ठाकरे हे करीत आहे.