TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, अपघात टाळा!

महावितरणचे नागरिकांना आवाहन

vijay waghmare by vijay waghmare
August 31, 2025
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

जळगाव प्रतिनिधी -: पावसाळ्यात वादळी व संततधार पाऊस किंवा पूरपरिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्किट आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती विद्युत यंत्रणा, उपकरणांपासून सावध राहावे, सर्व प्रकारची खबरदारी घेऊन सजग व सुरक्षित राहावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
घरात घ्यायची काळजी : सुरक्षिततेची पहिली पायरी!
आपले घर म्हणजे आपले सुरक्षित ठिकाण. पण पावसाळ्यात इथेही विद्युत अपघात होऊ शकतात. त्यामुळे विजेची उपकरणे, स्विच बोर्ड किंवा भिंती ओल्या असतील तर त्यांना अजिबात हात लावू नका. ओलसर हातांनी उपकरणे वापरणे टाळा. खिडक्या आणि बाल्कनीपासून विजेची उपकरणे दूर ठेवा. घरातील मीटरजवळ पाणी झिरपत असल्यास, तात्काळ मेन स्विच बंद करा आणि लगेच महावितरणला कळवा. मेन स्विचमध्ये चुकूनही तांब्याची तार वापरू नका. त्याऐवजी, वीजभाराला साजेसे अॅल्युमिनियम अलॉयचे विशिष्ट धातूचे फ्यूज वायर वापरा. यामुळे शॉर्ट सर्किट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होईल आणि मोठा धोका टळेल.
वायरिंगची तपासणी: तुमच्या घरातील वायरिंग जुनी झाली असेल तर त्वरित अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून ती तपासून घ्या. जुनी वायरिंग अपघातांना आमंत्रण देऊ शकते. खराब झालेली वायरिंग तात्काळ बदलून घ्या. वायरची जोडणी करताना ती तुकड्या-तुकड्यांमध्ये जोडू नका. जोडणी करावी लागल्यास चांगल्या इन्सुलेशन टेपचा वापर करा. याशिवाय, वीजजोडणीसाठी नेहमी ‘आयएसआय’ प्रमाणित साहित्यच वापरा. यात कोणतीही तडजोड नको! आपल्या घरातील अर्थिंग सुस्थितीत असावी आणि गरजेनुसार त्याची तपासणी करा. मिक्सर, हिटर, गिझर यांसारख्या उपकरणांसाठी थ्री-पिन सॉकेट वापरा, कारण त्यात अर्थिंगची व्यवस्था असते. भिंत, लोखंडी पत्रा, फ्रिज, टीव्ही, संगणक किंवा पाण्याचे नळ यांना हात लावल्यावर तुम्हाला झिणझिण्या जाणवत आहेत का? हे धोक्याचे लक्षण आहे! तात्काळ तुमच्या वायरिंगची तपासणी करून घ्या. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ओलसर लोखंडी पाईप किंवा पाण्याच्या पंपाला स्पर्श करण्यापूर्वी कोरड्या रबरी/प्लॅस्टिकच्या चपला वापरा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नका. विद्युत उपकरणे दुरुस्ती करता ना मेन स्वीच बंद करा. विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्या. विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका.
सर्किट ब्रेकर महत्त्वाचे : आकाशात विजा चमकत असतील तर विद्युत उपकरणे बंद करून त्यांचे प्लग सॉकेटमधून काढून टाका.आपल्या घरामध्ये ‘ईएलसीबी’, ‘आरसीसीबी’ किंवा ‘एमसीबी’ सारखे सर्किट ब्रेकर बसवून घ्या. ही उपकरणे विजेचा दाब वाढल्यास, शॉर्टसर्किट किंवा अर्थ फॉल्ट झाल्यास वीजप्रवाह खंडित करतात आणि आपणास सुरक्षित ठेवतात.
सार्वजनिक विद्युत यंत्रणेपासून सावध राहा : जिवाला धोका टाळा!
घराबाहेरही विजेचे धोके दडून असतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वादळामुळे तुटलेल्या किंवा झुकलेल्या वीजतारा, खांब, रोहित्राचे कुंपण, फ्यूज बॉक्स यांसारख्या गोष्टींपासून सुरक्षित अंतर राखा. तुटलेल्या तारांना अजिबात हात लावू नका किंवा त्या हटवण्याचा प्रयत्न करू नका. विजेच्या खांबांना किंवा स्टे वायरला जनावरे बांधू नका, दुचाकी टेकवू नका किंवा कपडे वाळत घालू नका. शेतातील तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडू नका. विद्यूत वाहीनीच्याखाली किंवा जवळ कोणतेही बांधकाम करू नका. कपडे वाळवण्यासाठी लोखंडी तारांचा वापर टाळा. टीव्हीची डिश किंवा अँटेना वीजतारांपासून सुरक्षित अंतरावर ठेवा. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. पत्रा वीजेचा उत्तम वाहक असल्याने जास्त धोका असल्याचेही महावितरणने कळविले आहे.
वीजपुरवठा खंडित होण्याची संभाव्य कारणे
पावसाळ्यात अनेकदा उन्हात तापलेले चिनी मातीचे इन्सुलेटर (चिमणी) पावसाने अचानक थंड होऊन तडकल्यास वीजप्रवाह खंडित होतो. खोदकामाने भूमिगत वाहिन्यांना धक्का लागल्यास किंवा पावसामुळे आर्द्रता निर्माण झाल्यास बिघाड होतो. झाडे कोसळणे, फांद्या तुटून पडणे, वीज कोसळणे यामुळेही वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. फिडर पिलर, रिंग मेन युनिटमध्ये पाणी शिरल्यास सुरक्षिततेसाठी वीजपुरवठा बंद करावा लागतो. वीज यंत्रणेजवळ टाकलेल्या कचऱ्यामुळे उंदीर, पक्षी यांसारखे प्राणी येतात आणि त्यांच्यामुळे शॉर्टसर्किट होऊन वीज जाते.
तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांकांसह विविध पर्याय:
वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास, महावितरण तुमच्या मदतीसाठी 24 तास तत्पर आहे, शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहक 1912 किंवा 19120, 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या 24 तास उपलब्ध असलेल्या टोल फ्री क्रमांकांवर ‍तक्रार दाखल करू शकतात. वीजपुरवठा खंडित झाल्यास लगेचच फोन न करता 15 ते 20 मिनिटे वाट पाहून महावितरणला संपर्क करावा. वादळामुळे किंवा अतिवृष्टीमुळे तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची माहितीही या क्रमांकांवर देऊ शकता. याशिवाय, ज्या ग्राहकांनी आपले मोबाईल नंबर महावितरणकडे नोंदणीकृत केले आहेत, ते 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल देऊ शकतात. तसेच, NOPOWER (12 अंकी ग्राहक क्रमांक)’ असा संदेश टाईप करून 9930399303 या क्रमांकावर पाठविल्यास वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविली जाईल आणि ग्राहकाला त्याची माहिती देणारा संदेश प्राप्त होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
Next Post

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ लोहमार्गच्या पोलिस निरीक्षकांसह उपनिरीक्षकांची नियंत्रण कक्षात तडका-फडकी बदली : सुरज सरडे यांच्याकडे पदभार

October 18, 2020

पवार साहेब खडसेंना न्याय देतील : धनंजय मुंडे

October 23, 2020

२४ तासांत ५१ हजारापेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद

October 26, 2020

पंडीत प्रदीपजी मिश्रा यांच्या कार्यक्रमात चोरी करणारी आंतरराज्यीय महिलांची टोळी जळगाव पोलिसांच्या जाळ्यात !

December 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group