अकोला (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाशिंबा नजीक भरधाव कारच्या धडकेत दोन दुचाकी स्वार ठार झाल्याची घटना शनिवार ५ ऑगस्ट रोजी दुपारी दरम्यान घडली. प्रशांत गावंडे, मिलिंद इंगळे असे अपघातातील मृताचे नाव आहे.
बोरगाव मंजू कडून अकोला कडे आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच ३० एके ८२९१) दुचाकीवरून प्रशांत बाबाराव गावंडे (वय ४३ बोरगाव मंजू), मिलिंद अंबादास इंगळे (वय ३८ तापडिया नगर, अकोला) हे दोघे बोरगाव मंजूवरुन अकोला कडे जात होते, दरम्यान पाठीमागून येणाऱ्या कार क्रमाक (एमएच ३६ एच १४५१) या कारने समोरच्या दुचाकीस पाठीमागून जबरदस्त धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार प्रशांत गावंडे, मिलिंद इंगळे, हे या अपघातात गंभीर जखमी झाले.
दरम्यान, या अपघातात एकाचा घटस्थळीच मृत्यू झाला तर दुसऱ्या गंभीर जखमीस ड्युटीवरुन घरी परत अकोला येथे जात असताना हेड कॉन्स्टेबल योगेश काटकर यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला. दरम्यान सदर चारचाकी कार वाहनासह ताब्यात घेऊन पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे सह पोलीस करत आहेत.
















