धरणगाव (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून शहरासह मुख्य बाजारपेठ असलेल्या जैन गल्ली परिसरात घरफोडी व चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून व्यावसायिक व नागरिक भयभीत झाले असून परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
जैन गल्ली परिसरात मागील वर्षभरापासून ते कालपावेतो पाच वेळा जबरी चोरी/ घरफोडी झाली आहे. मात्र अद्यापपर्यंत एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. याच निमित्ताने आज रोजी धरणगाव पोलिस स्थानक येथे शहरातील नागरिक व व्यावसायिक राहुल जैन, डॉ.मिलिंद डहाळे, गुलाबराव वाघ, विवेक लाड, प्रतीक जैन, डॉ.शैलेश सूर्यवंशी, अनंत विभांडीक, मनीष लाड, प्रफुल्ल जैन, डॉ.सूचित जैन, विनोद रोकडे, निकेत जैन, निशांत जैन, रोनक जैन, आदित्य जैन, प्रथम जैन, विलास जैन, विनोद जैन, अक्षय मुथा, सुयश डहाळे, शांतीलाल कुमट, दिपक संचेती, सुप्रीत जैन, पुनीत लाड, आयुष जैन, अनिल सिंधी, साहिल सिंधी आदींच्या शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक पवन देसले सो. यांची भेट घेत सद्या वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण पाहता पोलीस प्रशासनाने जैन गल्ली परिसरात किमान रात्री तरी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करीत, गंभीर पावले उचलून चोरट्यांचा तात्काळ तपास लावावा यांसह गस्त वाढविण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले.