पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ वसतिगृहातील एका तरुण विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रतीक विजयराव गोरडे (१९, रा. शिरसगाव कसबा, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती), असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ येथे अमरावती येथिल अठरा वर्षीय तरुण प्रतीक विजयराव गोरडे या तरुणाने दोन दिवसा पूर्वी प्लॅस्टिक डिप्लोमा कोर्सचा प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला होता. त्याने तेथीलच वसतिगृहात प्रवेश घेवून तेथेच वास्तव्यास होता. आज संध्याकाळी सात ते आठ वाजेचा दरम्यान त्याचा खोलीतून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तेथील वॉर्डन यांनी खोलीत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांना हा तरुण गळफास घेतला असल्याचे दिसले. त्याला तातडीने विद्यापीठाचा रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्याला तेथे मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच धरणगावचे पोलीस निरीक्षक पवन देसले, पाळधी पोलिस चौकीचे स. पो.नि.प्रशांत कंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेऊन माहिती घेतली. या वेळी त्यांना तेथे कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट मिळून आली नाही.