पाळधी ता. धरणगाव (शाहबाज देशपांडे) येथील एका होतकरू युवक असलेल्या सचिन गुरव नामक टेलरिंगच्या दुकानाला रात्री आग लागून त्यात मोठे नुकसान झाले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या प्रयत्नांनी गरीब तरुणास सामाजिक बांधिलकी म्हणून व्यवसाय उभारणीस मोठी मदत करण्यात आली. यानिमित्ताने पाळधीकरांकडून सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविण्यात आले.
दि.४ मार्च रोजी मेनरोड पाळधी येथील सचिन गुरव याचे दुकान आगीत भस्म झाले होते. त्यामुळे ना.गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या प्रयत्नाने त्या गरीब तरुणास सामाजिक बांधिलकी म्हणून आर्थिक मदत करण्यात आली. तसेच त्याला पुन्हा व्यवसाय उभे करण्यासाठी मदत केली. या मदतीत रोटरी स्टार क्लबतर्फे धनराज कासट यांनी शिलाई मशीन उपलब्ध करून दिले. तर जि. प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी रोख स्वरूपात मदत केली. त्याचपद्धतीने गावातील व्यवसाय धारकांनी आप-आपल्या परीने आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, .मुन्नाभाऊ झंवर, दीपक झंवर, राजू पाटील, प्रशांत झंवर, बारसु माळी, योगेश माळी, अरुण पाटील, लखन पाटील, दानिश पठाण, आकाश पाटील, बंटी पाटील, संदीप माळी, दिलीप पाटील, आबा माळी, अनिल माळी, शुभम पाटील आदी पस्थित होते. यावेळी आगग्रस्त सचिन गुरव यांनी उपक्रम बद्दल आभार मानले. दरम्यान, पाळधीकरांकडून यानिमित्ताने सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले.