भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वलवाडी येथील एका शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. १३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. एलजी हिरामण सोनवणे (वय ४७), असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतातील विहिरीजवळ काम करत असताना त्यांना सर्पाने दंश केला. यावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाहिले असता उपचारासाठी लागलीच भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासले असता त्यांना मयत घोषित करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मनोज माळी हे करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, ४ भाऊ असा परिवार आहे.