भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील प्रिंपीहाट येथील तलाठीसह खाजगी व्यक्तिला तीन हजाराची लाच भोवली आहे. दोघांविरुद्ध भडगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
भडगाव तालुक्यातील सावदा शिवारातील वडिलोपार्जित शेतजमीनिवरील बहिणीचे हक्क सोड पत्राची नोंद करण्यासाठी व सातबारा उतारे देण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंति 3 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून भडगाव तालुक्यातील पिंपरी हाट येथील तलाठी विलास शेळके व खाजगी धीरज नामक इसम यांच्या विरुध्द जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली. कोळगाव येथील शेतकऱ्याच्या तक्रारीवरून लाच मागणी प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशन येथे दोघाही संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.