मेष : घरात शुभ कार्य घडेल. समाजात तुमची कीर्ती वाढेल. कोणतेही सरकारी काम पुढे ढकलाल. आज आपण आपली दैनंदिन कामे शक्यतो दुपारपुर्वी उरकून घ्यावीत. दुपारनंतर काहींना निरुत्साह जाणवेल. प्रवास टाळावेत. आज तुमच्या व्यवसायात एक नवीन डील फायनल होईल. मनोबल कमी राहील. दुपारनंतर काहींना मनस्ताप संभवतो.
वृषभ : भावाचा सल्ला घ्यावा लागेल. आई-वडिलांसोबत देवदर्शनाला जाल. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. कामे मार्गी लागतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आज तुम्ही व्यवसायात काही नवीन करण्याचा प्रयत्न कराल. वाहने सावकाश व जपून चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.
मिथुन : कामात व्यस्त राहाल. टीकांकडे लक्ष देऊ नका. व्यावसायिक लोकांच्या मनात नवीन योजना येतील. दुपारनंतर काहींचा वेळ अनावश्यक कामात वाया जाणार आहे. प्रवास नकोत. आज कोणतेही काम करण्याचा विचार केलात तर ते शांतपणे पूर्ण कराल. महत्त्वाची कामे तसेच दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर अनावश्यक खर्च होणार आहेत.
कर्क : कुटुंबात काही शुभ कार्य घडतील. मित्राच्या मदतीने काम पूर्ण कराल. आरोग्य उत्तम राहणार आहे. काहींचा बौद्धिक प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज सन्मान मिळेल. पगारात वाढ होईल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. आरोग्य उत्तम राहणार आहे.
सिंह : मुलांचा आनंद पाहून तुम्हाला आनंद होईल. आज अध्यात्मात रुची वाढेल. लहान व्यावसायिकांना इच्छेनुसार नफा मिळेल. तुम्ही आपली कामे पूर्ण करणार आहात. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आत्म विश्वास वाढेल. मनोबल उत्तम राहील.
कन्या : भविष्यात मोठी समस्या येईल. नोकरदारांना वादविवाद टाळावे लागेल. आर्थिक कामाचा ताण कमी होईल. दुपारनंतर काहींना अनपेक्षित पणे नातेवाईक भेटतील. प्रवासाचे योग संभवतात. आज घर किंवा व्यवसायासाठी महत्त्वाचा निर्णय घेताना नीट विचार कराल.चिकाटीने कार्यरत रहाल. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे.
तुळ : मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक कराल. तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. दुपारनंतर अनपेक्षितपणे धनलाभ होईल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. सुसंवाद साधाल. आज तुमच्या कामाच्या वर्तणुकीबाबत वाद सोडवले जातील. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल वाढेल. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे.
वृश्चिक : व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज एकामागून एक फायदेशीर सौदे मिळतील. सासरच्या लोकांकडून आदर मिळेल. दुपारनंतर तुमचा उत्साह व उमेद वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आज व्यवसायासाठी वेळ काढात. कुटुंबातील कलह सुरु असेल तर तो संपेल. मनोबल चांगले ठेवावे. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.
धनु : सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. पैसे खर्च होतील. नवीन वस्तू खरेदी कराल. आज काहींची चिडचिड होणार आहे. दुपारनंतर एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आज व्यवसायात मोठी जोखीम घेण्याचा विचार करत असाल तर काही काळ पुढे ढकला. दुपारनंतर तुमची कामे रखडण्याची शक्यता आहे.
मकर : व्यवसायातील मंदीमुळे तुम्हाला प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. मुलांच्या लग्नातील अडचणी दूर होतील. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल जाणार आहे. तुमचा प्रभाव वाढेल. मनोबल उत्तम राहील. आज तुम्हााल व्यवसायात काही नुकसान होऊ शकते. महत्वाची कामे होतील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.
कुंभ : वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. कोणतेही काम घाईत करु नका, काम बिघडेल. तुम्ही अधिक जबाबदारीने वागणार आहात. मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे. वरिष्ठांकडून टोमणे ऐकावे लागेल. पोटदुखीचा त्रास उद्भवेल. मानसिक स्वास्थ्य जपावे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अपेक्षित प्रगती होईल.
मीन : वसायातील करार अंतिन असेल. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. बोलण्यात गोडवा ठेवा. दुपारनंतर काहींचा उत्साह वाढेल. प्रवास होणार आहेत. कामाचा ताण कमी होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. आज तुम्हाला बुद्धीने काम करावे लागेल. कोणाचीही दिशाभूल करु नका. दुपारनंतर तुम्हाला मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल.