TheClearNews.Com
Friday, September 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

चार वर्षांत महाराष्ट्रात ५०० हून अधिक सत्यशोधक विधी : अरविंद खैरनार

vijay waghmare by vijay waghmare
May 10, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

धरणगाव (प्रतिनिधी) –  धरणगाव येथील मोठा माळीवाडा समाज सभागृहात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा जागर, सामाजिक प्रबोधन आणि सत्यशोधक चळवळीचा प्रसार हा या सभेचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी प्रास्ताविकातून संघाच्या गेल्या चार वर्षांतील कार्याचा आढावा घेतला. यामध्ये सत्यशोधक विवाह, दशपिंड विधी, गृहप्रवेश, साक्षगंध सोहळे तसेच सत्यशोधक विधीकर्ते प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू असल्याची माहिती दिली.
तत्पूर्वी संत सावता महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अरविंद खैरनार होते. प्रमुख अतिथी म्हणून मोठा माळीवाडा समाजाध्यक्ष व्ही. टी. माळी, लहान माळीवाडा समाजाध्यक्ष रामकृष्ण महाजन उपस्थित होते. मान्यवरांचा शाल व महापुरुषांचे ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी व्ही. टी. माळी यांनी सत्यशोधक समाज संघाच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत, समाजातील युवकांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात अरविंद खैरनार यांनी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा इतिहास उलगडून सांगत, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी अज्ञान, अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रभर ५०० हून अधिक सत्यशोधक विवाह, दशपिंड विधी, गृहप्रवेश आणि साक्षगंध सोहळे पार पडले आहेत. बहुजन समाजाने कर्मकांड आणि अंधश्रद्धेपासून दूर राहून सत्यशोधक विचार आत्मसात करावेत, महापुरुषांचे साहित्य घरोघरी पोहोचवावे आणि वाचन संस्कृती वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर निबंध, वक्तृत्व, चित्रकला, प्रश्नमंजुषा स्पर्धा, रक्तदान शिबिरे, पुस्तक प्रकाशन, वृक्षारोपण आणि कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण अभ्यासवर्ग अशा विविध सामाजिक-शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी सत्यशोधक समाज संघाचे कार्यकर्ते राजेंद्र वाघ यांनी २३ व २४ मे २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देत, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. सभेत सत्यशोधक समाज संघाने शेतकऱ्यांच्या वजा उत्पन्न दाखला संदर्भातील न्यायालयीन लढ्यात मिळविलेल्या यशाचाही उल्लेख करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनील घनशाम सोनार यांना अभिष्टचिंतनानिमित्त ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्यांनी उपस्थितांना गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ हा ग्रंथ भेट दिला. कार्यक्रमास नगरसेविका ज्योती पाटील, नगरसेवक परमेश्वर महाजन, लक्ष्मण महाजन, जेष्ठ पत्रकार कडू महाजन, एस. डब्ल्यू. पाटील, राजेंद्र माळी, शिवदास महाजन (एरंडोल), सुनिल सोनार, कैलास पवार, वासुदेव महाजन, सुनील देशमुख, आप्पी महाजन, निलेश पवार, निवृत्ती माळी, दिपक माळी, भटूलाल महाजन, भैय्या धनगर, हेमंत माळी, प्रिती पाटील, ललिता वाघ यांच्यासह बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. डी. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन आर. डी. महाजन यांनी मानले. सभा यशस्वीतेसाठी आबासाहेब राजेंद्र वाघ, लक्ष्मणराव पाटील, कैलास वाघ आणि जयेश माळी यांनी विशेष सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanSatyashodhak Samaj Sangh's discussion meeting concluded with enthusiasm in Dharangaon

Related Posts

कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 सप्टेंबर 2026 !

September 23, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
Next Post

पीडब्ल्युडीच्या शाखा अभियंत्याला लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले ! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे धरणगाव तहसीलला निवेदन

January 20, 2025

गंगेत वाहणारे मृतदेह भाजपला मतदान करणार आहेत का? : संजय राऊत

January 17, 2022

पक्षनिष्ठ,प्रामाणिक, सत्शील राजकारणी : डॉ. राजेंद्र फडके…!

May 15, 2022

राजवड शिवारात बिबट्याचे दर्शन ; परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण !

November 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group