TheClearNews.Com
Sunday, November 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलांना प्रगतीपासून कोणालाही रोखता येणार नाही : ज्ञानदा कदम

The Clear News Desk by The Clear News Desk
July 5, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) “मागील पंधरा वर्षात माध्यम क्षेत्रातील महिलांचे स्थान बळकट होत गेलेले आहे. कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्वासाने आणि धडाडीने काम केले तर महिलांना प्रगतीपासून कोणालाही रोखता येणार नाही” असे मत एबीपी माझाच्या प्रख्यात वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांनी व्यक्त केले.

मिडीया एज्युकेटर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मीम)या महाराष्ट्रातील माध्यम शिक्षकांच्या संघटनेतर्फे ५ जुलै २०२१ रोजीआयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन व्याख्यानात “माध्यमे आणि महिला” या विषयावर ज्ञानदा कदम बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, विविध चॅनलमध्ये महिला पत्रकारांची संख्या वाढली. मात्र, अजूनही ड्युटीच्या वेळा लक्षात घेता या क्षेत्रात महिलांना येणे अवघड वाटते. या क्षेत्रात कधी कधी २४ -२४ तास फिल्डवर राहावे लागते. मुले झाल्यानंतर जबाबदाऱ्या वाढतात, अशावेळी घरच्यांनी जर समजून घेतले नाही तर त्या महिला पत्रकाराचे करियर तिथेच संपते अशी अनेक उदाहरणे मी पाहिली आहेत. एखाद्या पुरुष अँकरचे केस जेव्हा पांढरे होतात त्यावेळी कोणी चर्चा करत नाही मात्र एखाद्या स्त्री अँकरचे केस काळेच असायला हवेत, तिच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाच्या खुणा दिसू नयेत, अशा प्रकारच्या अपेक्षा केल्या जातात, हे मात्र खटकते असेही ज्ञानदा कदम यांनी सांगितले.

READ ALSO

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती !

महावितरणमध्ये बिरसा मुंडा यांना अभिवादन

अलीकडच्या काळात पत्रकारितेत फार मोठे बदल झाले आहेत. विशेषतः प्रिंट मीडिया समोर डिजिटल मीडियाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा या काळामध्ये समाज माध्यमातून येणाऱ्या माहितीची शहानिशा करून कमी वेळामध्ये ती लोकांसमोर सादर करणे हे कौशल्य आपणाजवळ असायला हवे, असे सांगून ज्ञानदा कदम म्हणाल्या की, मी प्रारंभी माध्यमाच्या क्षेत्रात आले तेव्हा रेडिओवर माझा आवाज बारीक आहे, म्हणून मला डावलण्यात आले. तेव्हाच मी ठरवले की मी एवढी मेहनत घेऊन माझा असा आवाज निर्माण करील तो संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला गेला पाहिजे. त्यादृष्टीने मी कधी-कधी पुरुष सहकाऱ्यांपेक्षा अधिक अठरा-अठरा तास काम केले त्यामुळे त्या परिश्रमाचे फळ मिळाले आहे, असे मला वाटते .

प्रत्येक कार्यक्रम करताना खूप तयारी, संशोधन करावे लागते याचे उदाहरण देताना ज्ञानदा कदम म्हणाल्या “माझा कट्टा” साठी एखादा कार्यक्रम करायचा असतो. त्या वेळेला ज्या व्यक्तीविषयी तो कार्यक्रम आहे, त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती घेऊन, त्या व्यक्तीचा संपूर्ण जीवनपट अवघ्या सव्वा मिनिटांमध्ये प्रभावीपणे लोकांसमोर सादर करायचा असतो. हे करण्यासाठी खूप अनुभव आणि संशोधन याची जोड द्यावी लागते. एखाद्या बातमीपत्राचे सादरीकरण कसे करतात केले जाते हे सांगताना त्या म्हणाल्या की, एखादे बातमीपत्र हे एखाद्या संतुलित आहारा सारखे असते. त्यात विविध प्रकारच्या बातम्या योग्य प्रमाणात घेऊन बुलेटीन सादर करावे लागते.

महिलांनी खूप मेहनत करून आणि चांगल्या प्रयत्नाने यश मिळवले तरी अनेकदा त्याविषयी शंका व्यक्त केल्या जातात. चांगले यश मिळवणाऱ्या महिलांना ट्रोल केले जाते. अशा वेळी महिलांना, त्या महिलांच्या घरच्यांना देखील खूप त्रास सहन करावा लागतो, असे स्पष्ट करून ज्ञानदा कदम म्हणाल्या की, अशा वेळी खचून न जाता ट्रोलिंगला चांगले उत्तर द्यायला हवे. जर महिलांनी पुरुषांच्या तोडीस तोड किंवा त्यांच्यापेक्षा अधिक काम केले तर महिलांची कोणतीही संधी डावलली जाईल, असे मला वाटत नाही.

अँकरिंग च्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणार्‍यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, या क्षेत्रात येण्यासाठी सर्वप्रथम पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण करा. त्याच प्रमाणे आजूबाजूच्या घडत असलेल्या घटना, घडामोडींकडे सजगपणे पहा, आपणाला केवळ सॉफ्ट बातम्या करायचा आहेत असे मनाशी न ठरवता प्रत्येक क्षेत्रातील बातम्या धडाडीने मांडण्याचे कार्य करा. आम्हा महिला अँकरना पूर्वी रात्रीच्या शिफ्टमध्ये काम दिले जात नव्हते, आम्ही भांडून ती जबाबदारी घेतली. सध्या आजूबाजूला स्पर्धा खूप आहे. त्यामुळे आपणाला जी संधी मिळते त्या संधीचे सोने करा, म्हणजे तुमचे करियर निश्चितपणे चांगले घडू शकेल. या कार्यक्रमात चांगले प्रश्न विचारणाऱ्या मीनल पाटील (जळगाव) आणि रसिका शिंदे (सोलापूर) या दोन विद्यार्थिनींना ज्ञानदा कदम यांच्यातर्फे पारितोषिक जाहीर करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी “मीम” संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर भटकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, माध्यम शिक्षकाची ही संघटना या क्षेत्रातील अध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम हाती घेणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यापुढेही नियमितपणे अशी व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी ज्ञानदा कदम यांचा परिचय करून दिला . संघटनेचे सचिव डॉ. विनोद निताळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या ऑनलाइन कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठ व महविद्यालयातील माध्यम शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती !

November 15, 2026
जळगाव

महावितरणमध्ये बिरसा मुंडा यांना अभिवादन

November 15, 2026
अमळनेर

पत्रकार सुरेश कांबळे विशेष सन्मानाने सन्मानित

November 15, 2026
गुन्हे

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून दागिने लंपास

November 15, 2026
गुन्हे

दिवाळीत गावाला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

November 14, 2026
गुन्हे

आनंद मेळाव्यात दोघांवर चाकू हल्ला

November 14, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या साडेचारशेवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Rate Today : सोन महाग, चांदीही वधारली ; जाणून घ्या..आजचा दर !

February 23, 2022

जामनेर येथील जैन बहुउद्देशीय संस्थेची प्रवेश प्रक्रिया बंद करण्याचे निर्देश

July 17, 2025

मालवाहू वाहनाने दुचाकीला दिली जोरदार धडक ; साखरपुड्याहून परतणारा तरुण ठार !

March 20, 2024

शिवसैनिकांची निष्ठा काय असते, हे येणाऱ्या काळात दाखवून देऊ : संजय सावंत

November 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group