नागपूर (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील कळमेश्वरमध्ये एका कारला झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात एका गंभीर जखमीला नागपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मारुती बलेनो कारने चार जण हे कळमेश्वरकडून नागपूरकडे जात होते. दहेगावजवळ पोहोचले असताना अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात कारमधील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला नागपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कळमेश्वर नागपूर या रस्तावर पंधरा दिवसांआधी दुचाकीचा अपघात झाला होता. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता.