नागपूर (वृत्तसंस्था) एका ४३ वर्षीय महिलेचा वॉशिंग मशीनचा करंट लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सिंधू हिरालाल शेंडे, असे मयत महिलेचे नाव आहे.
दि. १९ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्लॉट नंबर ११, आनंदनगर, जयताळा रोड, सोनेगाव येथे राहणाऱ्या सिंधू हिरालाल शेंडे या घरातील वॉशिंग मशीनमध्ये कपडे धूत होत्या. यावेळी त्यांना मशीनचा करंट लागल्याने त्या जागीच बेशुद्ध झाल्या. त्यांना उपचारासाठी ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी फिर्यादी विजय घनश्याम सोनवणे (३६, रा. वानाडोंगरी) यांनी दिलेल्या खबरीवरून सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.