जळगाव(प्रतिनिधी) शहरातील सुभाष चौकात बाजार करण्याकरिता आलेल्या ७० वर्षीय वृद्ध महिला यांचे सोने व चांदीच्या दागिन्याची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शनी पेठ परिसरातील सुभाष चौकात दि २२ रोजी सायंकाळी ७० वर्षीय वृद्ध यशोदा संतोष कोळी (रा.कठोरा) हि महिला बाजार करण्यासाठी आली असता तिच्या कापडी पिशवीमधुन सोने व चांदीचे तब्बल २ लाख ११ हजार रुपयांचे दागिने अनोळखी इसमाने चोरून नेले. सदरची घटना उघडकीस आल्यानंतर महिलेने शनीपेठ पोलिसात धाव घेत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.परिश जाधव हे करीत आहेत.