भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कजगाव येथील अवैध धंद्याच्या बाबतीत तक्रारी अर्ज दिल्यामुळे चौघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, एका २६ वर्षीय तरुणाने कजगावातील अवैध धंद्यांबाबत तक्रारी अर्ज दिला होता. यामुळे पीनू महाजन, राजू चव्हाण, विजू चव्हाण, धर्मा माळी (पूर्ण नाव माहित नाही, सर्व. कजगाव ता. भडगाव) या सर्वांनी मिळून दि. ४ जानेवारी रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास कजगाव बस स्थानकाजवळील धनश्री कॉम्प्लेक्स मधील एका झेरॉक्स दुकानाजवळ पिडीत तरुणाला अवैध धंद्या बाबत तक्रारी अर्ज दिल्याचा राग मनात धरुन चापटा बुक्यांनी मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करुन पाहुण घेऊ, अशी धमकी दिली. या प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे हे करीत आहेत.