जळगाव ( प्रतिनिधी ) : काहीही कारण नसतांना भिकन उर्फ नाना सुरेश चौधरी (वय ३७, रा. हरिविठ्ठल नगर) यांना दि. १० रोजी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास हनुमान मंदिरासमोर संशयित ललित सुभाष इंग्ळे रा. हरविड्ठल नगर याने शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली.
या मारहाणीत त्याने धारदार वस्तूने भिकन चौधरी यांच्या डोक्यात वार करीत गंभीर जखमी केले. रक्ताबंबाळ अवस्थेत चौधरी यांनी रामानंद नगर पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित ललित इंगळे याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.















