जळगाव (प्रतिनिधी) क्लासला सोडण्याकरीता वाहनावरील चालकाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणीला फोटो आणि व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तरुणीला पळवून नेत लग्न करीत तिचेआक्षेपार्ह फोटो काढून ते सोशल मीडियावर अपलोड करीत बदनामी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित गणेश साहेबराव पाटील (रा. रामेश्वर कॉलनी) या तरुणासह त्याला मदत करणाऱ्या मित्रांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका भागात अठरा वर्षीय तरुणी वास्तव्यास असून त्या तरुणीच्या वडीलांनी तरुणीसह तिच्या भावाला क्लास कॉलेजला सोडण्याकरीता वाहनावर गणेश पाटील याला चालक म्हणून लावले होते. त्यावेळी त्या तरुणाने तरुणीसोबत ओळख वाढवून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणीला क्लासला सोडण्यासाठी घरातून घेवून जात होता. परंतु तिला क्लासला न सोडता त्याच्या घरी नेत तिला शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी केली. तरुणीने त्यास नकार दिला असता, संशयिताने तीला मारहाण करीत तिच्यावर अत्याचार केला. तरुणी प्रचंड घाबरुन गेल्यामळे तीने प्रकाराची माहिती कोणालाही न सांगत तरुणासोबत बोलणे बंद केले. त्यावेळी संशयिताने तरुणीला मी तझे फोटो आणि व्हीडीओ व्हायरल करेल, अशी धमकी देवू लागला.
तरुणीची समजूत काढत नेले घरी
लग्न लावल्यानंतर संशयित गणेश पाटील हा तरुणीसह त्याच्या मित्रांसोबत पुण्याहून जळगावला आले. यावेळी तरुणीच्या वडीलांनी तरुणी हरविल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. त्यानंतर दोघे जण हे रामानंद नगर पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी तरुणीच्या वडीलांनी तरुणीची समजूत काढत तिला घरी घेवून गेले.
तरुणीसोबत लग्न लावून केला अत्याचार
क्लासला नेण्याच्या बहाण्याने तरुणीला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत संशयित गणेश पाटील याने तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर संशयित हा तरुणीला पळून जाण्याकरीता धमकावू लागला. त्याच्या धमकीला घाबरुन तरुणी दि. २७ रोजी तरुणासोबत पळून गेली. त्यानंतर आळंदी येथे तरुणाने तरुणीसोबत लग्न लावून घेत तिच्यावर पुन्हा मित्राच्या रुमवर नेवून अत्याचार केले.
सोशल मीडियावर व्हिडीओ केला व्हायरल
तरुणी प्रचंड घाबरलेली असल्याने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. तिच्या आईवडीलांनी तिला विश्वासात घेवून तिची समजूत काढल्यानंतर तरुणीने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. तसेच संशयीताने तरुणीसोबत लग्न केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून तरुणीची बदनामी करत असून तिला आत्महत्या करण्याची धमकी देत आहे. याप्रकरणी संशयित गणेश पाटील याच्यासह त्याला मदत करणाऱ्या तिघ मित्रांविरुद्ध पोक्सोतंर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तपास उपनिरीक्षक संजय शेलार हे करीत आहे.
















