जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल असलेल्या एका फरार आरोपीला सापळा रचून एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. सागर उर्फ टायगर दगडू चौधरी (वय- २४, रा.चौधरी वाडा) असे आरोपीचे नाव आहे.
चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात भाग-५ गुरंन २२२ भादवि कलम ३२६, ३२३ मधील आरोपी सागर उर्फ टायगर हा पोलिसांना मिळून येत नव्हता. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी गुन्हे शाखेचे पथक रवाना केले होते. पोहेका संदीप पाटील,पो.ना. प्रवीण मांडोळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, सागर उर्फ टाइगर हा चाळीसगाव शहरात येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. दरम्यान, गुन्ह्याच्या पुढील तपास कामी त्याला चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.