जळगाव(प्रतिनिधी) : जळगाव जिल्हयांत मोटार सायकल चोरीचे गुन्हयांत वाढ झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी सूचना निर्गमीत करुन मार्गदर्शन केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, यांना दि. १० नोव्हेबर २०२२ रोजी गुप्त माहितीद्वारे बातमी मिळाली आहे की, अडावद ता. चोपडा येथील राहणारा दिपक संजय शेटे व नविद शेख इजाज हे मोटार सायकल चोरी करुन त्याची कमी किंमतीत विक्री करतात अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने किसनराव नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे अधिनस्त पोहेको गोरखनाथ बागुल, संदिप रमेश पाटील अश्रफ शेख, संदिप सावळे, पोना.प्रविण मांडोळे, परेश महाजन, रविंद्र पाटील, लोकेश माळी, भारत पाटील, प्रमोद ठाकूर अशांचे पथक तयार करून त्यांना अडावद ता. चोपडा येथे रवाना केले असता पथकाने आरोपी नामे १) दिपक संजय शेटे वय २० रा. प्लॉट भाग, अडावद ता. चोपडा, २)नविद शेख इजाज वय २३ रा. मनियार अळी, अडावद ता.चोपडा जि.जळगांव यांना सापळा लावून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यात असलेल्या मोटार सायकल संदर्भात विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही चोपडा, अमळनेर, यावल, धुळे जिल्हयातील शिरपूर, थाळनेर व मध्यप्रदेश राज्यातील बलकवाडा जि.खरगोन येथून मोटार सायकल चोरी केलेल्या आहेत. सदर आरोपीतांनी चोरी केलेल्या १४ गुन्ह्यांमधील एकूण १५ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
१) चोपडा शहर पोलीस स्टेशन गुरनं. ३४३ / २०२२ भादंवि. क. ३७९ २) चोपडा शहर पोलीस स्टेशन गुरनं ४४७/२०२२ भादंवि.क. ३७९ ३) चोपडा शहर पोलीस स्टेशन गुरनं. ४४९/ २०२२ भादंवि क. ३७९ (४) चोपडा शहर पोलीस स्टेशन गुरनं. ४५१/२०२२ भादंवि.क. ३७९ (५) चोपडा शहर पोलीस स्टेशन गुरनं. ४५३ / २०२२ भादंवि क. ३७९ ६) अमळनेर पोलीस स्टेशन गुरनं. ५१३/२०२२ भादंवि क. ३७९ (७) यावल पोलीस स्टेशन गुरनं. ४५६/२०२२ भादंवि.क. ३७९ ८) शिरपुर पोलीस स्टेशन गुरनं. ५७०/२०२२ भादंवि. क. ३७९ ९) शिरपुर पोलीस स्टेशन गुरनं. ४९६/२०२२ भादंवि.क. ३७९ १०) शिरपुर पोलीस स्टेशन गुरनं. ४९८/२०२२ भादंवि.क. ३७९ ११) शिरपुर पोलीस स्टेशन गुरनं. ५४१/२०२२ भादंवि. क. ३७९ १२) शिरपुर पोलीस स्टेशन गुरनं. ५४० / २०२२ भादंवि. क. ३७९ १३) शिरपुर पोलीस स्टेशन गुरनं. २९३ / २०२२ भादंवि. क.३७९ १४) थाळनेर पोलीस स्टेशन गुरनं. ३६/२०२२ भादंवि क.३७९ वरील प्रमाणे ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही आरोपीतांना पुढील कायदेशीर कारवाईकामी मुद्देमालासह ताब्यात देण्यात आले आहे.