TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीतील उत्साह विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवावा : रोहिणीताई खडसे !

vijay waghmare by vijay waghmare
June 11, 2024
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

अहिल्यानगर (प्रतिनिधी) कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीतील उत्साह विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी केले. त्या पक्षाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थापनेला पंचवीस वर्ष पुर्ण झाले. त्यानिमित्ताने पक्षाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. पक्षातर्फे अहिल्यानगर (अहमदनगर) येथे”रौप्य महोत्सवी राष्ट्रवादी” या मुख्य कार्यक्रमाचे पक्षाचे अध्यक्ष खा .शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पक्ष स्थापनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले. या पंचवीस वर्षात शरद पवार यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली पक्षाने अनेक चढ उतार बघितले. त्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते साक्षीदार आहात. त्याबद्दल सर्वांचे आणि लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेल्या पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांचे रोहिणीताई खडसे यांनी अभिनंदन केले.

पुढे संवाद साधताना त्या म्हणाल्या, ही लोकसभा निवडणुक पक्षासाठी अत्यंत महत्वाची होती या निवडणुकीत सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेले नियोजन, घेतलेली जबाबदारी आणि घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर पक्षाला घवघवीत यश मिळून पक्षाचे दहा पैकी आठ खासदार निवडून आले त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि आभार. पंचवीस वर्षाच्या काळात अनेक चढउतार सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अनुभवले परंतु या वेळची निवडणूक वेगळी होती. सर्व आपल्या हरण्याची वाट बघत होते परंतु असे म्हणतात जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा प्रत्येक जण तुमच्या हरण्याची वाट बघत असतो आणि आपण जो विजय मिळवला आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि हा तुमच्या प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीने मिळाला आहे.

सर्वांचे लक्ष बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते तेथे सुप्रियाताई या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या. ताईंनी मतदारसंघात केलेले विकास कामे आणि मतदारसंघातील लोकांसोबत असलेला त्यांचा जनसंपर्क यामुळे ताई एक लाख अठ्ठावन हजार मतांच्या भरघोस लिडने निवडून आल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान काही लोकांनी सुप्रियाताईंवर खालच्या स्तरावर जाऊन टिका केली परंतु ताईंनी संयम बाळगला ताईंच्या या संयमाला मी सलाम करते. ताईंसाठी दोन शब्द बोलते, सब सितम वाले बहोत कमजोर समजे ते जिसे,उसने इस गुलशन मे हंगामा माचाकर रखं दिया सारे तुफान चुप रहे सारी आंधिया बैठी रही, और एक तितली ने दरखतो को हिला के रख दिया, अशा सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या पुरोगामी विचारसरणीत आम्ही काम करतो याचा अभिमान असल्याचे रोहिणीताई खडसे यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी १०६ प्रचार सभा घेतल्या हे सोपे नव्हते शरद पवार साहेबांनी एकेका दिवशी चार ते पाच सभा घेतल्या हे सोपे नव्हते, शरद पवार साहेबांच्या तब्बेतीवर काही लोक टिका करायचे त्यांच्यापेक्षा जास्त प्रचार सभा मेळावे घेऊन साहेबांनी दाखवून दिले वय नाही हिंमत आणि जिद्द लागते त्या जिद्दीच्या जोरावर आपण लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.

लोकसभा निवडणुकीतील हा उत्साह आपल्याला अजून तीन महिने विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवायचा आहे हाच उत्साह घेऊन जे गद्दार आपल्याला सोडून गेले किंवा ज्यांनी गद्दारी केली त्यांना आपल्याला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवून त्यांना जमिनीवर आणायचे आहे महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माता भगिनींनी प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन हि निवडणूक महिलांनी बदलली आणि महिलांनीच या बदलामध्ये सहभाग घेतला आहे त्याबद्दल सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांचे रोहिणीताई खडसे यांनी अभिनंदन करूनआभार व्यक्त केले.

यावेळी पक्षाच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया ताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, माजी मंत्री आ.अनिल देशमुख, आ.राजेश टोपे, आ.जितेंद्र आव्हाड, आ.रोहित पवार, खा.अमोल कोल्हे, खा.निलेश लंके, खा.बजरंग सोनवणे, खा.अमर काळे, खा.धैर्यशील मोहिते, खा.बाळ्यामामा म्हात्रे, खा.भास्कर भगरे आणि पक्षाचे सर्व खासदार,आमदार, सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष, नेते , पदाधिकारी , कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: rashtrawadi congresRohini khadse

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

...म्हणून करण पवार यांचा पराभव झाला ; धरणगाव कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देवाने शास्त्र तर मानवाने तंत्रज्ञान बनविले – यु. व्ही. राव

February 7, 2025

बारावी बोर्ड परीक्षा : 15 डिसेंबरपासून परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार

December 13, 2020

उत्खननादरम्यान किल्ले रायगडावर पुरातन सोन्याच्या वस्तू सापडल्या

April 3, 2021

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 24 फेब्रुवारी 2025

February 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group