जळगाव (प्रतिनिधी) – खुन्नस देण्याच्यासह शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन शेख सलीम शेख लतीफ (वय ५४, रा. भादली रोडअसोदा, ता. जळगाव) यांना आठ जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉडसह विळ्यांनी मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. १५ मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भादली रोडवरील पिलू मोहल्ल्यात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील असोदा येथे शेख सलीम शेख लतीफ हे वास्तव्यास आहे. दि. १५ मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खुन्नस देण्यासह शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन आठ जणांच्या टोळक्याने शेख सलीम यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर गैरकायद्याची मंडळी जमावून त्यांनी लोखंडी रॉडसह विळ्याने शेख सलीम यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या हाताला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना जीवेठार मारण्याची धमकी देखील दिली. शेख सलीम यांनी उपचार घेतल्यानंतर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित जाहीद शेख रउफ, रउफ शेख समद, अजमद शेख समद, मुस्तकीय शेख समद, अरशद शेख समद, फैजान शेख रउफ, शेख नसरीनबी शेख रउफ, फतीमा बी शेसख मुस्कीय (सर्व रा. असोदा, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ प्रकाश चिंचोरे हे करीत आहे.















